शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेचा ताबा घेण्यास मनाई करणाऱ्या आदेशाला स्थगिती

By admin | Updated: October 20, 2016 01:45 IST

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊ नये, या जिल्हा न्यायालयाने लवाद कायद्याच्या कलम ९ च्या अनुषंगाने

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेने शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊ नये, या जिल्हा न्यायालयाने लवाद कायद्याच्या कलम ९ च्या अनुषंगाने मंगळवारी दिलेल्या मनाई आदेशास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे यांनी बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. लवादाच्या एका सदस्याचे नाव सुचविण्यासंदर्भात औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने लवाद कायद्याच्या कलम ११ नुसार दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. या याचिकेसोबतच महापालिकेच्या वरील याचिकेची सुद्धा एकत्रित सुनावणी २१ आॅक्टोबर रोजी होणार आहे. औरंगाबाद महापालिकेने १ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसोबतचा करार रद्द केला. महापालिकेच्या या निर्णयाविरुद्ध सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जिल्हा न्यायालयात लवाद कायद्याच्या कलम ९ नुसार महापालिकेस ताबा घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत दावा दाखल केला होता. न्यायालयाने काल महापालिकेला पाणीपुरवठा योजनेचा ताबा घेण्यास मनाई केली होती. औरंगाबाद महापालिकेने या आदेशास बुधवारी खंडपीठात आव्हान दिले. महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. अनिल बजाज यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सदर पाणी पुरवठ्याबाबतचे प्रकरण खंडपीठात प्रलंबित आहे. यापूर्वी कंपनीने खंडपीठात याचिका दाखल केली असता खंडपीठाने कुठलाही मनाई आदेश दिला नव्हता. केवळ कंपनीची बँक गॅरंटी जप्त करूनये, असे निर्देश महापालिकेला दिले होते. जिल्हा न्यायालयाने मनाई आदेश देताना याबाबतच्या तीन ‘मापदंडा’ (पॅरामीटर्स) ऐवजी केवळ महापालिकेने सकृतदर्शनी मनाई आदेश मिळविण्यायोग्य मुद्दे (प्रायमाफेसी केस) मांडल्याचाच विचार केला. मात्र,सध्या दाव्याचा समतोल दावेदाराच्या बाजूने (बॅलन्स आॅफ कन्व्हेनियन्स) आहे काय, त्याचप्रमाणे मनाई आदेश दिला नाही, तर दावेदाराचे न भरून येणारे नुकसान (इररिपेरेबल लॉस) होईल काय या दोन महत्त्वाच्या मुद्यांचा विचार केल्याचे दिसत नाही. आपल्या युक्तिवादाच्या पुष्ट्यर्थ अ‍ॅड. बजाज यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा संदर्भ दिला. करारातील कलम ३७.१ प्रस्तुत प्रकरणात लागू होत नाही, अशा परिस्थितीत जिल्हा न्यायालयाने दिलेला मनाई आदेश रद्द करावा, अशी विनंती त्यांनी केली, तर कंपनीतर्फे अ‍ॅड. रामेश्वर तोतला यांनी जिल्हा न्यायालयाचा आदेश योग्य असून तो रद्द करूनये, असा युक्तिवाद केला. या प्रकरणात अ‍ॅड. बजाज यांना अ‍ॅड. दीपक पडवळ, अ‍ॅड. हर्षिता मंगलाणी, अ‍ॅड. हर्षवर्धन बजाज, अ‍ॅड. नवीन रेड्डी आणि अ‍ॅड. ऋचीर वाणी यांनी सहकार्य केले.