शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

समूहशेतीला मिळणार पाठबळ!

By admin | Updated: May 28, 2014 00:24 IST

जालना : शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे या माध्यमातून शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यासाठी समूह शेतीच्या योजनेस पाठबळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जालना : शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे या माध्यमातून शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यासाठी समूह शेतीच्या योजनेस पाठबळ देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शेतकर्‍यांची कमी होणारी जमीन, शेतीसाठी भांडवल पुरवठा करताना येणार्‍या तांत्रिक अडचणी, जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता तसेच कृषी विस्तारास असलेल्या मर्यादा आदी बाबींचा विचार करून गट शेतीस चालना देणे क्रमप्राप्त ठरले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा एकत्रित अवलंब करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न करणे, उत्पादित मालाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शेतमाल विक्रीची सामूहिक व्यवस्था ही गरज बनत चालली आहे. बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्श शेती पध्दतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांच्या समूह/गट शेतीस चालना देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शेतकर्‍यांचा गट तयार करुन समूह शेती ही योजना आगामी काळात राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कृषी विस्तारामार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांना एकत्रित गटाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांची माहिती घेऊन शेतकर्‍यांचे वैयक्तिक प्रश्नसुध्दा सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. गटातील शेतकर्‍यांशी मोबाईलव्दारे संपर्क साधून हवामान, पीक उत्पादन, तंत्रज्ञान, कीड व रोग सर्वेक्षण आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी एकत्र आल्यामुळे त्यांचे संघटन होऊन गटामार्फत प्राथमिक प्रक्रिया विक्री यामध्ये शेतकरी सहभाग घेऊन अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी सहकार्य करतील. या देण्याची योजनेची अंमलबजावणी २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संचालक (आत्मा) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. दरम्यान, या योजनेत जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविल्यास त्यांना निश्चितच फायदा मिळू शकतो. विशेषत: शेतीसाठी पाणी आणि उत्पादित मालाला जास्त भाव मिळेल, अशी आशा कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी) शेतीवर आधारित व शेतीपूरक उद्योगांना चालना देणे आणि त्या माध्यमातून शोतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालास जास्तीत जास्त भाव मिळवून देणे, शेतकर्‍यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर ऊंचावणे यासाठी समूह शेतीची योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना हवामान, पीक, उत्पादन, मालाचा बाजार भाव आदी माहिती मोबाईलव्दारे समूह सदस्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. सन २०१४-१५ या वर्षात शेतकर्‍यांच्या समूह/गट शेतीस चालना देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यास ५०.०० लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आली आहे. या रकमेतून योजनेच्या जनजागृतीसह अंमलबजावणीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.