...अन भींत हादरताच सायरन लागला वाजायला

By Admin | Updated: August 18, 2015 23:55 IST2015-08-18T23:55:34+5:302015-08-18T23:55:34+5:30

बदनापूर : येथील बुलढाणा अर्बन पतसंस्थेतील स्ट्राँगरूमची भींत हादरताच सायरनचा आवाज सुरू झाला त्यामुळे परिसरातील नागरिक आवाक् झाले.

Suddenly there was a siren | ...अन भींत हादरताच सायरन लागला वाजायला

...अन भींत हादरताच सायरन लागला वाजायला


बदनापूर : येथील बुलढाणा अर्बन पतसंस्थेतील स्ट्राँगरूमची भींत हादरताच सायरनचा आवाज सुरू झाला त्यामुळे परिसरातील नागरिक आवाक् झाले. मात्र नंतर हे प्रात्यक्षिक असल्याचे कळाले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.
सध्या अनेक ठिकाणी बँकांमध्ये चोऱ्या होत असून, असा प्रकार बदनापूर शहरात होऊ नये म्हणून येथील पोलिसांनी बँकांच्या सुरक्षेची पाहणी केली. यावेळी बुलढाणा अर्बन पतसंस्थेतील सुरक्षेची पाहणी करण्यात आली असता येथील स्ट्राँगरूमच्या दारात सुरक्षा तर आहेच मात्र चोरट्यांनी दार सोडून भिंती तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर येथे लावलेले सायरन लगेच वाजू लागते याकरीता पोनि शितलकुमार बल्लाळ यांनी या बँकेतील स्ट्राँग रूमच्या भिंतीला तोडण्याचे प्रात्यक्षिक केले. या भिंतीला हादरे बसताच या पतसंस्थेतील सायरन वाजू लागले. यामुळे परिसरातील नागरिकांनाही काही अनूचित प्रकार घडल्याची शंका आली. मात्र हे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

Web Title: Suddenly there was a siren