शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
3
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
4
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
5
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
6
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
7
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
8
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
9
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
10
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
11
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
12
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
13
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
14
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
15
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
16
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
17
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
18
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
19
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
20
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

२८ टीसी अन् २५ रेल्वेत अचानक तपासणी; एकाच दिवशी विनातिकीट ५०० प्रवाशांना दणका, दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 15:24 IST

विनातिकीट प्रवास पडला महागात! रेल्वेला 'चुना' लावणाऱ्या ५०० प्रवाशांना नांदेड विभागाने शिकवला धडा

छत्रपती संभाजीनगर: रेल्वे प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवास करून रेल्वेला 'चुना' लावणाऱ्या प्रवाशांना नांदेड विभागाने मोठा दणका दिला आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने राबविलेल्या एका विशेष तिकीट तपासणी मोहिमेत अवघ्या एका दिवसात तब्बल ५०० प्रकरणांचा पर्दाफाश झाला. या कारवाईत रेल्वे प्रशासनाने ३ लाख ४२ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल केला असून, 'काही होणार नाही' या बेफिकीर वृत्तीला चपराक दिली आहे.

नांदेड विभागातील २८ तिकीट तपासनिसांनी २५ वेगवेगळ्या रेल्वेंमध्ये अचानक तपासणी करून ही मोठी कारवाई यशस्वी केली.

एकाच दिवसात ४४९ विनातिकीट प्रवासी पकडले
दक्षिण मध्य रेल्वेने २६ मार्च रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ८ या कालावधीत ही विशेष मोहीम राबवली. या दरम्यान ४४९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना रंगेहाथ पकडले गेले. त्यांच्याकडून २ लाख १४ हजार ४१० रुपये भाडे आणि १ लाख १५ हजार १९० रुपये दंड, असा एकूण मोठा महसूल वसूल करण्यात आला. विनातिकीट प्रवासासोबतच अनियमित प्रवास करणाऱ्या १५ जणांवरही कारवाई करण्यात आली, ज्यांच्याकडून ७ हजार ४८० रुपये दंड आकारला गेला.

सामान बुक न करणाऱ्यांनाही बसला फटका
केवळ तिकीटच नाही, तर रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करून सामान (Luggage) बुक न करता प्रवास करणाऱ्या ३६ प्रवाशांनाही या मोहिमेत दंड भरावा लागला. त्यांच्याकडून ५ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन करणे रेल्वे कायद्यानुसार दंडनीय अपराध असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

प्रवाशांना रेल्वेचे कळकळीचे आवाहन
"प्रवाशांनी नेहमी वैध तिकीट काढूनच प्रवास करावा. तसेच सोबत असलेले सामान नियमानुसार बुक करावे," असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेने केले आहे. सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा अशा धडक मोहिमा भविष्यातही सुरूच राहतील, असा इशारा रेल्वे विभागाने दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive Ticket Checking Drive Nets ₹3.4 Lakh in Fines

Web Summary : A ticket checking blitz in Nanded Division caught 500 passengers without tickets. ₹3.4 lakh was recovered in fines. Passengers are urged to travel with valid tickets and book luggage properly.
टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेड