शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकासमुळे विद्यार्थिनींची वाट झाली सुकर

By admin | Updated: August 19, 2014 02:13 IST

देवगावफाटा : ज्या गावातील विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी बस नाहीत अशा देवगाव, चिकलठाणा, मोरेगाव परिसरासह सेलू तालुक्यातील विद्यार्थिनींना

देवगावफाटा : ज्या गावातील विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी बस नाहीत अशा देवगाव, चिकलठाणा, मोरेगाव परिसरासह सेलू तालुक्यातील विद्यार्थिनींना मानव विकास उपक्रमांतर्गत सायकलचा लाभ मिळाला असल्यामुळे विद्यार्थिनींची शिक्षणाची वाट सुकर झाली आहे़ देवगाव येथील नखाते विद्यालयात बोरकिनी येथून (४ किमी), चिकलठाणा येथील नेताजी विद्यालयातील ३६ विद्यार्थिनी, रायपूर, निरवाडी, चिकलठाणा खु़ येथून तर मोरेगाव येथील पांडुरंग विद्यालयातील ४७ विद्यार्थिनी साळेगाव, खेर्डा, खादगाव, खादगाव सोनवटी शाळेत दररोज पायी येत होत्या़या विद्यार्थिनींची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे घर ते शाळा हा ५ किमीचा प्रवास दररोज पायी करावा लागत असल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता़ गट शिक्षणाधिकारी एस़ पी़ कुलकर्णी व समन्वयक विषयतज्ज्ञ भुजंग थोरे यांनी तालुक्यातील विद्यार्थिनंीना त्यांच्या शाळेत जाण्यासाठी मानव विकास अंतर्गत बसचे नियोजन केले़ त्यानंतर ज्या गावांत बस जात नाही अशा गावांचा आढावा घेतला़ मानव विकास कार्यक्रमांतर्गत आठवी ते बारावीतील २८८ विद्यार्थिनींचा सायकलचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला़ त्यापैकी बँकेत खाते उघडलेल्या २४५ विद्यार्थिनींच्या खात्यावर प्रत्येकी २ हजार रुपये वर्ग केले़ या पैशातून विद्यार्थिनींनी सायकल खरेदी केल्या़ यानंतर एक हजार रुपये विद्यार्थिनींच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. या विद्यार्थिनींनी आता दररोज सायकलवरून ये-जा करू लागल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे़ सायकल मिळाल्यामुळे या विद्यार्थिनींमध्ये नव चैतन्य निर्माण झाल्याची भावना पांडुरंग विद्यालयातील प्रतीक्षा डोईफोडे हिने प्रतिक्रिया दिली़ (वार्ताहर)