प्रश्न निकाली निघेपर्यंत विडी कारखाना बंद़़़

By Admin | Updated: May 13, 2014 01:17 IST2014-05-13T00:00:32+5:302014-05-13T01:17:49+5:30

नांदेड : मारतळा येथील विडी कामगारांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात उपोषण सुरु केले आहे़

Stop the WD factory until the question is removed | प्रश्न निकाली निघेपर्यंत विडी कारखाना बंद़़़

प्रश्न निकाली निघेपर्यंत विडी कारखाना बंद़़़

 नांदेड : मारतळा येथील विडी कामगारांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात उपोषण सुरु केले आहे़ त्यात सोमवारी मनसेने कामगार अधिकारी कार्यालयावर धडक दिल्यानंतर कामगार अधिकार्‍यांनी प्रश्न निकाली निघेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ मारतळा येथील चारभाई विडी कामगार कारखान्यात जाणार्‍या कामगारांना प्रवास खर्च मिळावा या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरु करण्यात आले आहे़ परंतु कारखाना व प्रशासनाने त्याची दखल घेतली नव्हती़ सोमवारी मनसेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांनी कामगार अधिकार्‍यांनी भेट घेवून या प्रकरणाचा तिढा सोडविण्याची मागणी केली़ त्यानंतर कामगार अधिकारी अ़ज़पेटके यांनी कारखाना व्यवस्थापनाला प्रश्न निकाली निघेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ तसेच कामगारांना नांदेड ते मारतळा ये-जा करण्यासाठी प्रवास खर्च जानेवारी २०१४ पासून मंजूर केलेला कामगारांनी मागितला आहे़ परंतु व्यवस्थापनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे़ व्यवस्थापनाने स्थानिक कामगारांना सोडून आंध्रातून कामगार आणून काम करुन घेत आहेत़़ त्यामुळे कामगारांचा प्रश्न निकाली निघेपर्यंत हा कारखाना बंद ठेवावा, असे आदेशात म्हटले आहे़ दरम्यान मनसेच्या यशस्वी शिष्टाईमुळे विडी कामगारांचा प्रश्न मार्गी लागला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Stop the WD factory until the question is removed