भाववाढीसाठी सिरसाळ्यात रास्ता रोको

By Admin | Updated: January 23, 2015 00:56 IST2015-01-23T00:21:28+5:302015-01-23T00:56:28+5:30

सिरसाळा : उसाची एफआरपी प्रमाणे रक्कम देण्यात यावी, कापसाची हमी भावाने खरेदी करावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील परळी-

Stop the way to increase prices | भाववाढीसाठी सिरसाळ्यात रास्ता रोको

भाववाढीसाठी सिरसाळ्यात रास्ता रोको


सिरसाळा : उसाची एफआरपी प्रमाणे रक्कम देण्यात यावी, कापसाची हमी भावाने खरेदी करावी, या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील परळी-बीड मार्गावर असणाऱ्या मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले. दोन तासाहून अधिक वेळ चाललेल्या या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. गुरुवारी आठवडी बाजाराचा वार असल्याने अनेकांची तारांबळ उडाली.
वैद्यनाथ साखर कारखाना पांगरी, माजलगाव कारखाना तेलगाव आणि जय महेश पवारवाडी या तीन साखर कारखानदारांनी उसाचा पहिला १५०० रु. प्रमाणे भाव दिला परंतु एफआरपी प्रमाणे रक्कम दिली नाही. ती रक्कम एफआरपी प्रमाणेच देण्यात यावी, पाण्याअभावी वाळत चाललेला ऊस तात्काळ गाळपासाठी नेण्यात यावा तसेच कापसाचीही शासनाच्या हमी भावाप्रमाणे खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शासन अवलंबित असलेल्या प्रत्येक धोरणावर सडकून टीका करण्यात आली.
या दोन्ही मागणीचे निवेदन परळीचे नायब तहसीलदार प्रमोदराव परळीकर यांना देण्यात आले.
त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे पी.एस. घाडगे यांच्यासहीत उत्तम माने, डॉ. पंढरीनाथ पवार, गंगाधर पोटभरे, सुदाम शिंदे, शिवाजीराव देशमुख आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना एक तास लागला.

Web Title: Stop the way to increase prices