शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या ३२ दुचाकी जप्त; चौघांना अटक

By admin | Updated: August 1, 2014 00:26 IST

लातूर : शहरातील क्रीडासंकुल, शिवाजी चौक, पाच नंबर चौक, दयानंद गेट, बसस्थानक आदी ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दुचाकीची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे़

लातूर : शहरातील क्रीडासंकुल, शिवाजी चौक, पाच नंबर चौक, दयानंद गेट, बसस्थानक आदी ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या दुचाकीची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे़ याप्रकरणातील चार आरोपींना गजाआड करुन त्यांनी चोरलेल्या ३२ दुचाकी जप्त केल्या आहेत़लातुरातील पीव्हीआर सिनेमागृहात एक व्यक्ती वाहनांशी छेडछाड करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानंतर गांधी चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी़आऱसोनटक्के यांच्या सूचनेनुसार संजय फुलारी, राम बनसोडे, पोक़ॉ नागेश कारेवाड यांनी बीड जिल्ह्यातील धारुर येथील आरोपी गणेश कादे यास चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले़ अधिक चौकशी केली असता त्याने इतर ३ साथीदारांचीही माहिती दिली़ त्यानुसार गणेशचे साथीदार आरोपी कृष्णा श्रीरंग सोनटक्के धारूर जि़बीड, आप्पासाहेब बलभीम क्षीरसागर रा़वैराग जि़ सोलापूर व रणजित उर्फ गुरूनाथ शिवाजी तांबारे रा़ उपळे ता़बार्शी जि़सोलापूर यांनाही सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक धनवे व कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले़ या सर्वांचीच कसून चौकशी केली असता त्यांनी लातूर शहरासह विविध भागातून तब्बल ३२ दुचाकी चोरल्याचे कबूल केले़ पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन वाहने विक्री केलेल्या ठिकाणी जाऊन दुचाकी जप्त केल्या आहेत़ या दुचाकींची किंमत जवळपास १२ लाख रुपये असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली़ (प्रतिनिधी)