शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मेमध्येही पाणीपातळी तग धरून

By admin | Updated: May 25, 2014 01:10 IST

बीड: जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी समाधानकारक झालेल्या पावसाने जिल्ह्याची पाणीपातळी अद्यापही तग धरून आहे. याला अवकाळी पावसाचाही फायदा झाला आहे.

बीड: जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी समाधानकारक झालेल्या पावसाने जिल्ह्याची पाणीपातळी अद्यापही तग धरून आहे. याला अवकाळी पावसाचाही फायदा झाला आहे. यामुळे जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई अल्प आहे. गतवर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. यामुळे गाव, वाडी-वस्त्यांवरील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यामुळे जिल्ह्यात पाचशेच्या वर टॅँकर सुरू करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्याची पाणीपातळीही तब्बल ९ मीटरपर्यंत खालावली होती. नंतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्याची पाणीपातळी वाढली आहे. अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी पाणीपातळी अद्यापही तग धरून असल्याने अनेक ठिकाणी ग्रामस्थांना अद्यापही समाधानकारक पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १२६ विहिरींवर पाणीपातळी घेण्यात आली असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या कार्यालयातून देण्यात आली. गतवर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने पाणीपातळी ८.६२ पर्यंत खालावली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीपातळी ७.४७ पर्यंत आली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाणीपातळी वाढली असली तरी बीड, केज व वडवणी तालुक्यातील पाणीपातळी अल्प प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. यामुळे शेतकर्‍यांसह सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींची पाणीपातळी घटली आहे. तसेच विविध ठिकाणच्या कूपनलिकांचीही पाणीपातळी घटली आहे. अशा ठिकाणी आज पाणीटंचाई आहे. मात्र, ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे तेथे पाणीपातळी तग धरून आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक बी.एस.मेश्राम म्हणाले की, जिल्ह्याची पाणीपातळी अद्याप समाधानकारक आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर नाही; परंतु काही ठिकाणी जलभरण व ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम राबविले जात नसल्याने तेथील पाणीप्रश्न गंभीर बनत आहे. यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.(प्रतिनिधी) तालुका नमुना घेतलेल्या विहिरी पाणीपातळी वाढ/घट अंबाजोगाई १२ ७.०५१.७३ आष्टी २३ ७.८३ ०.४० बीड १७ ९.८९ - ०.४३ धारूर ०३ ७.२०१.५९ ेगेवराई १७ ८.६०२.२३ केज ०३ ७.९० - ०.१९ माजलगाव १६ ६.६५ ३.१५ परळी १० ४.०३२.८८ पाटोदा ०९ ६.२४ १.१५ शिरूर १० १०.३७ ०.४६ वडवणी ०६ ६.४५ - ०.३५