शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मराठा, ओबीसी समाजाला गाजर दाखवत आहे; अंबादास दानवे यांचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: July 15, 2024 19:34 IST

सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो: अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगरः मराठा आरक्षणाचे नेते  मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाचा इशारा द्यावा लागला. हे सरकार मराठा आणि ओबीसी समाजाला गाजर दाखवत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते आ. अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला.

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी राज्यसरकारने बोलावलेल्या सर्वपक्षिय बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकल्यामुळे  तुमच्यावर टिका होत आहे, याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आम्ही आधीपासून म्हणतो की, मराठा आरक्षणाविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मात्र सरकार त्यांची  भूमिका स्पष्ट करत नाही. सरकार जेव्हा अडचणीत असते तेव्हा त्यांना विरोधी पक्ष आठवतो, अशी टिकाही आ.दानवे यांनी केली. आमच्या पक्षप्रमुखांनी आधीच आरक्षणाची मर्यादा वाढविण्याची भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

महायुतीच्या सरकारने बजेटपेक्षा दहा पट खर्चाच्या निविदा काढल्यामहायुतीचे सरकार हे टक्क्केवारीचे सरकार असल्याचा आरोप करीत आ.दानवे म्हणाले की,सार्वजनिक बांधकाम विभागासाठी केवळ १८ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर असताना राज्य सरकारने या विभागाच्या सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांच्या विकास कामाच्या निविदा काढल्या आहेत. यामुळे आर्थिक ताळमेळ नसलेले हे सरकार आहे.

विधीमंंडळात मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविलाआ. दानवे म्हणाले की, काल परवा संपलेले राज्य विधीमंडळाचे अधिवेशन हे या सरकारचे शेवटचे अधिवेशन होते. विरोधी पक्षनेता म्हणून आपण मराठवाड्यासंबंधी विविध प्रश्न उपस्थित केल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी पीक विमा, गर्भलिंग निदान चाचणीचे नुकतेच उघडकीस आलेली प्रकरणे, सातारा परिसरातील रहिवाशांना करण्यात येत असलेली गुंठेवारीची सक्ती संदर्भातही आवाज उठविल्याचे ते म्हणाले. 

जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवरनुकत्याच पकडण्यात आलेल्या इसिस संबंधित अतिरेक्यांच्या टार्गेटवर जगप्रसिद्ध वारसास्थळ असलेली वेरूळची लेणी असल्याचे समोर आले आहे. असे असताना केंद्रीय पुरातत्व विभाग लेण्यांच्या सुरक्षेसंदर्भात  गंभीर नसल्याचा आरेाप आ.दानवे यांनी केला. ते म्हणाले की,मागील वर्षभरात सुमारे २५ लाख पर्यटकांनी लेण्यांना भेटी दिल्या. यात विदेशी पर्यटकांची संख्याही अधिक हाेती. यामुळे अजिंठा आणि वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा च्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आपण शासनाकडे केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद