शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीला स्थगिती; निवडणूक आता वॉर्ड पद्धतीनेच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 13:13 IST

प्रभाग आरक्षण सोडतीला राज्य शासनाची स्थगिती 

ठळक मुद्देशिवसेनेच्या गोटात आनंदोत्सवसेनेचा काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत सत्तेचा इरादा

औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरू केली होती. बुधवारी १८ डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाची सोडतही निश्चित झाली होती. आज दुपारी अचानक राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे महापालिका निवडणूक जुन्या वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आयोगाने घेतलेल्या आजच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाची लाट पसरली आहे.

प्रभाग निवडणुकीत आजपर्यंत भाजपला चांगलाच फायदा झाला आहे. त्यादृष्टीने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने घ्यावी, असा भाजपचा आग्रह होता. तत्कालीन भाजप सरकारने त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाला सूचना दिल्या होत्या. मागील काही दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनुसार मनपाकडून प्रारूप आराखडा तयार करून घेतला. १८ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रभाग आरक्षणासंदर्भात सोडतही आयोजित करण्यात आली होती. 

राज्यातील महाआघाडीच्या सरकार स्थापनेनंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका निवडणूक पूर्वीप्रमाणेच म्हणजेच वॉर्ड पद्धतीने घ्यावी, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला होता. आज दुपारी अचानक महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाकडून एक पत्र प्राप्त झाले. १८ डिसेंबर रोजी प्रभाग रचनेच्या आरक्षणासाठी काढण्यात येणारी सोडत पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हे पत्र आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना पाठविले आहे.

शिवसेनेच्या गोटात आनंदशहरात ११५ वॉर्ड आहेत. २०१५ मध्ये मनपा निवडणुकीत सेनेने स्वबळावर २९ उमेदवार निवडून आणले होते. भाजपचे २३ उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेने महाआघाडी स्थापन केली आहे. आगामी मनपा निवडणूकही महाआघाडीनुसारच होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मनपात सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा सेनेचा आहे. 

भाजप बॅकफूटवरमागील काही दिवसांपासून भाजपने महापालिकेत शिवसेनेची चारही बाजूने कोंडी करणे सुरू केले आहे. १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ सर्व भाजप नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे सादर केले आहेत. प्रभाग निवडणुकीच्या प्रक्रियेतही भाजपने आपली सोय करून घेतल्याचे बोलले जात होते. त्यावर आज शिवसेनेने पाणी फेरण्याचे काम केले.

सर्वत्र एकच पद्धत हवीराज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्यात आल्या आहेत. औरंगाबादेतही प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली होती. आता पुन्हा वॉर्ड पद्धतीकडे जाणे चुकीचे आहे. भाजपला यामुळे काही फरक पडणार नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री, राज्य निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे.             -अतुल सावे, आमदार, भाजप

आम्हाला निवडणूक सोपी; पद्धत कोणतीही चालेलशिवसेनेला प्रभाग निवडणुकीचा फारसा त्रास नव्हता. आमच्यासाठी निवडणूक महत्त्वाची असते. आमचे नगरसेवक, कार्यकर्ते सदैव जनतेच्या संपर्कात, सेवेत असतात. त्यामुळे निवडणूक सोपी आहे. वॉर्ड पद्धतही आम्हाला चालेल. मी अद्याप राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय बघितला नाही. उद्या बघणार आहे. - प्रदीप जैस्वाल, आमदार, शिवसेना

...तर सेनेची कोंडी             प्रभाग पद्धती शिवसेनेला अवघड गेली असती. काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांना निवडणूक लढवावी लागेल. तिन्ही पक्षांचे चिन्ह वेगळे आहेत. त्यामुळे त्यांची कोंडी झाली असती. एमआयएमला प्रभाग, वॉर्ड कोणतीही पद्धत चालेल.- शेख अहेमद, जिल्हाध्यक्ष, एमआयएम.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस