शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:29 IST

Delhi Blast : कार स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपासच्या अनेक वाहनांची जळून राख झाली, ज्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला.

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये सोमवारी मोठा स्फोट झाला. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जखमी झाले. मात्र आता मृतांचा आकडा वाढला आहे. लेटेस्ट अपडेट्सनुसार, मृतांची संख्या १२ झाली आहे आणि जखमींची संख्या २५ झाली आहे.

कारस्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपासच्या अनेक वाहनांची जळून राख झाली, ज्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिसर आगीने वेढला गेला आणि जखमी मदतीसाठी ओरडत होते. जखमींमध्ये गौरी शंकर मंदिरातून परतणारे अंकुश शर्मा (२८) आणि राहुल कौशिक (२०) यांचा समावेश आहे. स्फोटात अंकुशचे शरीर सुमारे ८० टक्के भाजले आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे.

 "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?

दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा स्फोट आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे. फरिदाबाद मॉड्यूलच्या अटकेची माहिती मिळताच संशयिताने आत्मघाती हल्ल्याची योजना आखल्याचं तपासात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामागील हेतू निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित एजन्सी प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत.

वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट

स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी शहरात सुरक्षा वाढवली आहे. राजधानीतील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), जीआरपी आणि प्रमुख स्थानकांवर श्वान पथकं तैनात करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर प्रवाशांची तपासणी आणि गस्त देखील वाढवण्यात आली आहे.

"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा

प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, स्फोट अत्यंत स्फोटक पदार्थामुळे झाला होता, ज्यामुळे जवळपासची अनेक वाहनं उद्ध्वस्त झाली आणि जवळच्या इमारतींच्या खिडक्या फुटल्या. स्फोटात वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांचा प्रकार निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक पथके ढिगाऱ्यांचे नमुने तपासत आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Car Blast Kills 12, Injures 25 Near Red Fort

Web Summary : A car explosion near Delhi's Red Fort metro station killed 12 and injured 25. The blast, possibly a suicide attack, damaged nearby vehicles. Police have heightened security across the city, investigating the incident under UAPA and explosives act.
टॅग्स :delhiदिल्लीcarकारBlastस्फोटPoliceपोलिसDeathमृत्यू