शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-सिल्लोड-फर्दापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाला सुरुवात

By admin | Updated: September 10, 2014 00:51 IST

सिल्लोड : येथे औरंगाबाद-सिल्लोड- फर्दापूर रस्त्याचे चौपदरीकरण

सिल्लोड : येथे औरंगाबाद-सिल्लोड- फर्दापूर रस्त्याचे चौपदरीकरण रस्ता व खडकपूर्णा वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभामुळे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील पर्यटन, कृषी व औद्योगिक क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी केले.९९ कि.मी लांबी व ७३५ कोटी रुपयांच्या औरंगाबाद-सिल्लोड-फर्दापूर रस्त्याचे चौपदरीकरण आणि सिल्लोडसाठी खडकपूर्णा प्रकल्पावरून वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या १०० कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या हस्ते व पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी फुलंब्रीचे आ. कल्याण काळे, माजी जि.प. अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे, तालुकाध्यक्ष गणेश दौड, सोयगाव तालुकाध्यक्ष आबा काळे, शहराध्यक्ष प्रा. मन्सूर कादरी, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दुर्गाबाई पवार, जालना लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, उपविभागीय अधिकारी चुन्नीलाल कोकणी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधीक्षक अभियंता मुखेडकर, कार्यकारी अभियंता जुमळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता रामदास पालोदकर, जि.प.सदस्य श्रीराम महाजन, बाबूराव चोपडे, कौतिकराव मोरे, कल्पनाताई लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल, केशवराव तायडे, देवीदास लोखंडे, उपनगराध्यक्ष किरण पवार, न.प. गटनेता नंदकिशोर सहारे, आदींसहित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.फुलंब्री मतदारसंघातही भूमिपूजनफुलंब्री : औरंगाबाद-सिल्लोड-फर्दापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी फुलंब्रीतही दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आ. डॉ. कल्याण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सभापती सुनीता भागवत, उपसभापती डॉ. सारंग गाडेकर, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष आनंदा ढोके, पं. स. सदस्य किशोर बलांडे, रऊफ कुरैशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदाम मते, बाजार समिती सभापती संदीप बोरसे, इलियास शाह, वरुण पाथ्रीकर, देवीदास ढंगारे, अजय शेरकर, अनिल बोरसे, मुदस्सर पटेल, आरेफ पटेल, जनार्दन तुपे, कचरू मैंद उपस्थित होते.