शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारावर पथकाची नजर

By admin | Updated: September 30, 2014 01:25 IST

उस्मानाबाद : शालेय पोषण आहार योजनेचे लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी

उस्मानाबाद : शालेय पोषण आहार योजनेचे लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य समिक्षा पथकाचे गठन केले आहे. शाळांमधील आहाराची वेळोवेळी तपासणी करण्याचे काम ही समिती आता करणार आहे. यामुळे पोषण आहार योजनेतील काळा बाजार बंद होऊन पोषण आहार गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोंचण्यास मदत होणार आहे. दरम्यान, सध्या उस्मानाबाद, औरंगाबादसह सहा जिल्ह्यात ही तपासणी करण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वाढीसाठी आवश्यक ते घटक मिळावेत, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दररोज वेगवेगळ्या पध्दतीचा आहार ठरवून देण्यात आला आहे. त्यासाठी शाळांना पुरवठा विभागामार्फत तांदूळ आणि शासनाने नेमलेल्या कंत्राटदारामार्फत अन्य साहित्य पुरविले जाते. असे असले तरी अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या आहारामध्ये सातत्य नसल्याचे तसेच पुरविल्या जात असलेल्या तांदूळ आणि अन्य साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात होत असतात. याशिवाय आवश्यक त्या प्रमाणात आहार शिजविला जात नसल्याचेही शासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. याची दखल घेऊन राज्य शासनाने आहाराच्या अंमलबजावणी यंत्रणेची तपासणी करण्यासाठी राज्य समिक्षा पथकाचे गठण केले आहे. या पथकामार्फत शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेची व आहाराची तपासणी करण्यात येणार आहे. हे पथक अंमलबजावणीची तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना सूचविणारा अहवाल शासनाला सादर करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या तपासणीतून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात सदर योजना कशा पध्दतीने राबविली जाते, हेही समोर येणार आहे. (प्रतिनिधी)