शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म-डॉ. यू. म. पठाण सुचिता...

By admin | Updated: May 6, 2014 10:52 IST

मन-कल्पना बोडीत ना । करित शरिराची विटंबना ।।१।। चारा वर्षाची पर्थणी ।। केस वोडून नासले पाणी ।।२।। कामे अभिलासी नरनारी । काय करिल काशी गोदावरी? ।।३।। विधि, प्रयाग वांया गेले । काग, बग गोंदी नाहाले ।।४।। शेख महंमद हुदई चांग । गोदा, वाराणसी अष्टांग ।।५।।

मन-कल्पना बोडीत ना । करित शरिराची विटंबना ।।१।। चारा वर्षाची पर्थणी ।। केस वोडून नासले पाणी ।।२।। कामे अभिलासी नरनारी । काय करिल काशी गोदावरी? ।।३।।विधि, प्रयाग वांया गेले । काग, बग गोंदी नाहाले ।।४।।शेख महंमद हुदई चांग । गोदा, वाराणसी अष्टांग ।।५।।शरीराच्या पावित्र्याबरोबरच मनाचं पावित्र्यही महत्त्वाचं आहे, इतकंच नव्हे, तर तसेच अधिक महत्त्वाचं आहे, याविषयी संत कवी शेख महमदांनी या अभंगात विवेचन केलेलं आहे. उपासना करण्याचे तीन मार्ग आहेत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग हे ते तीन मार्ग होत. खरं तर, हे तिन्ही मार्ग एकमेकांना पूरक असेच आहेत, पण काही वेळेला त्यांचा उपयोग एकारल्यासारखा होतो. ज्ञानमार्गी पोथीपांडित्याच्या मागं लागले, कर्ममार्गी कर्मठ होऊन केवळ कर्मकांडी झाले किंवा भक्तिमार्गीयांनी डोळस होऊन भक्तीचा स्वीकार केला नाही, तर निखळ साधना किंवा उपासना होणार नाही आणि या सर्वांच्या मागं मनाच्या शुचितेचं अधिष्ठान असणं अत्यंत आवश्यक आहे. केवळ मुंडन करून किंवा गंगेत वा गोदावरीत स्नान करून आपण पवित्र झालो, असं कुणाला वाटत असेल, तर त्याचा काही उपयोग नाही. शेख महंमद म्हणतात, की असे तर कावळे नि बगळेदेखील या नद्यांत स्नान करतात. मन पवित्र नसेल तर आणि मनात वासना असेल तर अशा स्नानाचा काय उपयोग? अशी माणसं काशी किंवा प्रयागसारख्या तीर्थांना गेली, तरी ती अशुद्धच राहतील. मन पवित्र नसेल, तर या सर्व गोष्टी व्यर्थ होत. ज्ञानदेवांनीदेखील शुचितेची व्याख्या करताना तिची तुलना सूर्याशी केली आहे. ते म्हणतात, सूर्य हा जसा अंतर्बाह्य तेजस्वी असतो, तसं साधकाचं किंवा भक्तांचं अंत:करणही पवित्र असावं नि शरीरही पवित्र असावं.