शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

तीन दवाखान्यांच्या कामांना मिळणार गती

By admin | Updated: October 25, 2014 23:47 IST

जालना : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एन.यू.एच.एम.) अंतर्गत जालना नगरपालिकेला शहरात पाणीवेस, रामनगर आणि नूतन वसाहत या भागात तीन नागरी दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली.

जालना : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (एन.यू.एच.एम.) अंतर्गत जालना नगरपालिकेला शहरात पाणीवेस, रामनगर आणि नूतन वसाहत या भागात तीन नागरी दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून सरकारी यंत्रणा निवडणुकांच्या कामांमध्ये व्यस्त असल्याने या दवाखान्यांसाठीची प्रक्रिया थांबली होती. मात्र या कामाला आता गती येईल, असा विश्वास सूत्रांनी वर्तविला.शहरात पाणीवेस व रामनगर या भागात नगरपालिकेचे दवाखाने आहेत. पाणीवेस येथील आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामामुळे हा दवाखाना सध्या नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत सुरू आहे. मात्र दोन्ही दवाखान्यांसाठी एक एमबीबीएस आणि एक बीएएमएस वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. शिवाय अन्य स्टाफही अपुरा आहे. औषधसामग्रीही अपूर्णच आहे. त्यामुळे शहरातील बहुसंख्य रुग्णांना अन्य दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जावे लागते. विशेष म्हणजे दररोज या दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी असते. परंतु तेथील स्टाफ कमी असल्याने सुविधांचा अभाव होतो.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत शहरात नवीन तीन दवाखान्यांना मंजुरी मिळावी, यासाठी पालिकेने गेल्या एक वर्षापासून संबंधितांकडे पाठपुरावा सुरू केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले व तीन दवाखान्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र या दवाखान्यांचे ठिकाण पालिकेनेच निश्चित करावे, अशी सूचना ‘एनयूएचएम’ ने केली होती. त्यानुसार पालिकेचे जुने पाणीवेस व रामनगर या दवाखान्यांसह नूतन वसाहत भागात नवीन दवाखाना सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. आॅगस्ट २०१४ मध्ये या तीन नागरी दवाखान्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती महिला वैद्यकीय अधिकारी जे.एम. डेकोवाडिया यांनी दिली. तीन दवाखान्यांसाठी प्रत्येकी २ असे ६ एमबीबीएस डॉक्टर असणार असून अन्य स्टाफची भरती वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.या दवाखान्यांमध्ये कर्मचारी भरती तसेच अन्य प्रक्रिया विधानसभा निवडणुकीमुळे थांबली होती. मात्र ती आता लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)४या योजनेनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक थेट एनयूएचएम मार्फत केली जाते. शिवाय परिचारिका, फार्मासिस्ट, लॅबटेक्नीशिएन या पदांची भरती नगरपालिकेला करावी लागणार आहे. औषधसामग्री व इतर सुविधा एनयूएचएम मार्फत पुरविल्या जातात. ४५० हजार लोकसंख्येला एक दवाखाना असणे आवश्यक आहे. शहरातील लोकसंख्या तीन लाखांच्या जवळपास आहे. त्यामुळे सहा दवाखान्यांची गरज आहे. त्यासाठी नगरपालिकेने पाणीवेस, रामनगर यासह नूतन वसाहत, चंदनझिरा, शास्त्री मोहल्ला, मूर्गी तलाव या दवाखान्यांची शिफारस केली होती. परंतु एनयूएचएमने यातील तीन दवाखान्यांनाच मंजुरी दिली.