शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती

By admin | Updated: May 22, 2014 00:10 IST

धारुर: धारुर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धनेगाव येथील धरण कोरडे पडल्यामुळे एक महिन्यापासून पाणीपुरवठा नळ योजना बंद आहे

 धारुर: धारुर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धनेगाव येथील धरण कोरडे पडल्यामुळे एक महिन्यापासून पाणीपुरवठा नळ योजना बंद आहे. शहरवासियांचे पाण्यासाठी हाल होत असताना धारुर न.प.ने तांदळवाडी तलावावरुन तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या कामाला गती दिली आहे. या योजनेसाठी २७ लक्ष रुपयांचा निधी मिळाला होता. याचे पाणी लवकरच धारुर शहराला मिळणार आहे. ऐन वेळेला पाण्याचे संकट शहरवासियांवर ओढवले असताना नगराध्यक्षा सविता शिनगारे यांनी तांदळवाडीच्या तलावातून तात्पुरती योजना सुरू करुन ही तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेसाठी २७ लक्ष रुपयांचा निधी खर्च होणार आहे. धनेगावचे धरण कोरडे पडले असताना शहरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. शहरवासियांवर पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आली होती. मात्र नगराध्यक्षा शिनगारे यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन तांदळवाडीच्या तलावातून तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात केली आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर असून, अवघ्या आठवडाभरात या तलावाचे पाणी धारुर शहरवासियांना पिण्यास मिळणार आहे. धारुर, केजसह बारा खेड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी धनेगाव धरणावरुन २५ वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजना करण्यात आली. मात्र यावर्षी हे धरण कोरडे पडल्याने एक महिन्यापासून नळ योजनेला पाणी आले नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली होती. धारुर शहरातील नागरिकांना पाणी टंचाई भासू नये म्हणून धारुर नगर परिषदेने उपाययोजना करुन शहरापासून ४ कि.मी. अंतरावर असणार्‍या तांदळवाडी तलावावरुन तात्पुरती पाणीपुरवठा योजना सुरू केली. तांदळवाडीच्या तलावातील मुबलक पाणीपुरवठा लक्षात घेऊन या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. अवघ्या आठवडाभरात हे काम पूर्ण असून, या तलावातील पाणी धारुर शहरातील नागरिकांनी पिण्यासाठी उपलब्ध करुन, असा विश्वास नगराध्यक्षा शिनगारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. तांदळवाडीतून धारुरला पाणी आणल्यानंतर शहरात चार दिवसाच्या आत कसे पाणी पुरविले जाईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच या पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती दिली असून, लवकरच काम पूर्ण करू, असे नगराध्यक्षा म्हणाल्या. (वार्ताहर)