फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेची खास मोहीम

By Admin | Updated: October 7, 2014 00:44 IST2014-10-07T00:29:31+5:302014-10-07T00:44:23+5:30

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने दोनदिवसीय तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.

Special operation of railways against futuristic passengers | फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेची खास मोहीम

फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेची खास मोहीम

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने दोनदिवसीय तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये मोहिमेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी रेल्वेस्थानकावर १२८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन काही लोक विनातिकीट प्रवास करीत आहेत. याचा सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होत आहे, अशा प्रवाशांना रोखण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने सोमवारी धडक तिकीट तपासणी मोहीम राबविली. ७ आॅक्टोबर रोजीही ही मोहीम राबविली जाणार आहे. रेल्वेस्थानकावर सहायक वाणिज्य व्यवस्थापक कमलाकर राव यांनी गुरुवारी प्रवाशांकडे तिकीट तपासणी केली. यावेळी अशोककुमार यांच्यासह ६ तिकीट निरीक्षक, ५ आरपीएफ जवानांचा मोहिमेत सहभाग होता. नांदेड रेल्वेस्थानकावरही ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये दिवसभरात औरंगाबाद व नांदेड येथून एकूण दीड लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Special operation of railways against futuristic passengers