विशेष सभेची अतिघाई अंगलट
By Admin | Updated: August 20, 2014 00:47 IST2014-08-20T00:45:51+5:302014-08-20T00:47:43+5:30
औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीतील चार सदस्यांनी घाई-घाईने एलबीटी बंद करून जकात सुरू करण्याच्या मागणीसाठी विशेष सभेचे पत्र महापौर कला ओझा यांना १४ आॅगस्ट रोजी दिले होते.

विशेष सभेची अतिघाई अंगलट
औरंगाबाद : महापालिका स्थायी समितीतील चार सदस्यांनी घाई-घाईने एलबीटी बंद करून जकात सुरू करण्याच्या मागणीसाठी विशेष सभेचे पत्र महापौर कला ओझा यांना १४ आॅगस्ट रोजी दिले होते. मात्र, व्यापाऱ्यांच्या रोषापुढे मनपाला जकात सुरू करण्याचा निर्णय कागदावरच ठेवावा लागला; परंतु विशेष सभेसाठी केलेली घाई सत्ताधाऱ्यांच्याच अंगलट आल्याचे दिसते आहे.
स्थायी समितीतील चार सदस्यांनी विशेष सभा घेण्यासाठी महापौरांना पत्र दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांत सभेची नोटीस जारी करावी लागते.
मात्र, पत्र देऊन पाच दिवस उलटले, तरी सभेबाबत महापौरांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. नगरसचिव प्रमोद खोब्रागडे यांनीही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी, स्थायी समितीच्या विशेष अधिकारांचे हनन झाले आहे. मीर हिदायत अली, काशीनाथ कोकाटे, संजय चौधरी, प्रीती तोतला या सदस्यांनी सभेसाठी पत्र दिले होते. व्यापाऱ्यांचा एलबीटी, जकात या दोन्ही करप्रणालींना विरोध आहे. असे असताना मनपा पदाधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण इच्छेसाठी जकात सुरू करण्याची तयारी सुरू केली होती. त्यावरून सेनेत दोन गट पडले. खा.चंद्रकांत खैरे यांनी जकातीला विरोध केला, तर इतर नेते याप्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहेत.
महापौरांशी चर्चा करू
महापौर ओझा यांच्याशी विशेष सभाप्रकरणी चर्चा करण्यात येईल. जकात सुरू करण्याचा सध्या तरी काहीही विषय नाही.