सोयगाव तहसीलने राबविले ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:06 IST2021-03-21T04:06:25+5:302021-03-21T04:06:25+5:30

सत्तार यांनी सोयगाव तहसील कार्यालयाला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. ‘माझे कार्यालय सुंदर कार्यालय’ या उपक्रमाच्या भित्तीपत्राचे विमोचन त्यांनी ...

Soygaon tehsil launched 'Sundar Maazhe Karyalay' campaign | सोयगाव तहसीलने राबविले ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान

सोयगाव तहसीलने राबविले ‘सुंदर माझे कार्यालय’ अभियान

सत्तार यांनी सोयगाव तहसील कार्यालयाला भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. ‘माझे कार्यालय सुंदर कार्यालय’ या उपक्रमाच्या भित्तीपत्राचे विमोचन त्यांनी केले. विविध विभागांना भेटी दिल्या. कार्यालयातील झालेल्या बदलांबद्दल तहसीलदार प्रवीण पांडे व नव्याने नियुक्त झालेल्या उपविभागीय अधिकारी डॉ. माधुरी तिखे यांचेच कौतुक केले. सोयगाव तहसील कार्यालयाचा कायापालट झालेला आहे. कार्यालय केवळ सुंदरच नव्हे तर कार्यप्रणालीसुद्धा गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, धरमसिंग चव्हाण, दिलीप मचे, संतोष बोडखे यांची उपस्थिती होती.

फोटो : सोयगाव तहसील कार्यालयात पाहणी करताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपविभागीय अधिकारी डॉ. माधुरी तिखे, प्रभाकर काळे सह आदी.

Web Title: Soygaon tehsil launched 'Sundar Maazhe Karyalay' campaign