बर्ड फ्लू रोखण्यासाठी सोयगाव तालुक्यातील यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST2021-01-13T04:11:02+5:302021-01-13T04:11:02+5:30

सोयगाव : बर्ड फ्लूचा संसर्ग तातडीने रोखण्यासाठी प्रत्येक गावातून ३५ पक्ष्यांचे नमुने घेण्याचे आदेश सहायक आयुक्त पशुसंवर्धन रोग ...

Soygaon taluka system ready to prevent bird flu | बर्ड फ्लू रोखण्यासाठी सोयगाव तालुक्यातील यंत्रणा सज्ज

बर्ड फ्लू रोखण्यासाठी सोयगाव तालुक्यातील यंत्रणा सज्ज

सोयगाव : बर्ड फ्लूचा संसर्ग तातडीने रोखण्यासाठी प्रत्येक गावातून ३५ पक्ष्यांचे नमुने घेण्याचे आदेश सहायक आयुक्त पशुसंवर्धन रोग अन्वेषण विभागाने दिले आहे. त्याअनुषंगाने सोयगाव पशुवैद्यकीय विभागाने तालुक्यात एक पथक नियुक्त केले असून, त्यांच्याद्वारे प्रत्येक गावातून ३५ पक्ष्यांचे तीन प्रकारचे नमुने घेतले जाणार आहे. त्याची तपासणी करून काही धोका असेल तर काळजी घ्यावी लागणार आहे.

सोयगाव तालुक्यात स्थलांतरित पक्ष्यांची संख्या जास्त आहे. यासाठी बर्ड प्लूचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुणे येथील पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त यांनी मंगळवारी ऑनलाइन बैठकीद्वारे सर्वांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने सोयगाव तालुक्यात पथक स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती डॉ. मुंजाजी कंधारे यांनी दिली.

-----------

सोयगाव तालुक्यात पाच कर्मचाऱ्यांचे पथक

सोयगाव तालुक्यात पक्ष्यांचे नमुने घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या पाच कर्मचाऱ्यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले.

या पथकात डॉ. व्ही.व्ही. चव्हाण, डॉ. मुंजाजी कंधारे, जी.टी. काकडे, ए.के. दाभाडे, एम.एस. काळे आदींचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Soygaon taluka system ready to prevent bird flu