शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
4
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
5
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
6
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
7
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
8
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
9
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
10
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
11
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
12
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
13
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
14
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
15
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
16
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
17
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
18
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
19
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
20
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणे महागले

By admin | Updated: May 14, 2014 01:01 IST

निसर्गाचा प्रकोप आणि शासनाने बियाण्यातून हटविलेली सबसिडी यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दामाने प्रचंड उड्डाण घेतली.

हिंगोली : निसर्गाचा प्रकोप आणि शासनाने बियाण्यातून हटविलेली सबसिडी यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दामाने प्रचंड उड्डाण घेतली. गतवर्षी सरसकट कंपन्यांच्या सोयाबीनची एक बॅग १ हजार ७०० रूपयांच्या आत खरेदी केलेल्या उत्पादकांना यंदा कितीही पैसा मोजला तरी सोयाबीनचे प्रमाणित बियाणे मिळणे दुर्मिळ झाले. परिणामी महाबीजच्या ३० किलोच्या एका बॅगसाठी २ हजार ३८५ तर इगलसाठी २ हजार ७०० रूपये आजघडीला मोजावे लागत आहेत. सध्याच्या दरात पाऊस पडताच आणखीच वाढ संभवित असल्याने कदाचित अनेक उत्पादकांना कंपन्यांचे बियाणे मिळणार नाही. सोयाबीन काढणीच्यावेळी झालेल्या पावसाने उत्पादकांची माती केली. पिकाच्या नुकसानीबरोबर सोयाबीनला बाधा पोहोचली. पाण्यामुळे स्वपरागसिंचित असलेल्या सोयाबीनच्या उगवणशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने घरचे सोयाबीन पेरणीला मर्यादा आली. आता त्याचा फटका सर्वच शेतकर्‍यांना बसताना दिसतो. दरम्यान, शासनाने सोयाबीन बियाणे उत्पादीत करणार्‍या कंपन्यांना सबसिडी दिली नाही. परिणामी भाववाढ अटळ झाल्याने आज उत्पादकांना सोयाबीनचे बियाणे खरेदी करताना कर्ज काढण्याची पाळी आली. जवळपास सर्वच उत्पादकांनी सोयाबीनचा पेरा अधिक ठेवल्याने त्याच्या क्षेत्रात विक्रमी वाढ झाली. गतवर्षीच्याच क्षेत्राएवढेही सोयाबीनचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध नाही. यंदा झालेल्या वाढीचा प्रश्न कोसो मैैल दूर असल्याने उत्पादकांच्या कपाळावर आठ्या उमटू लागल्या. आतापासूनच हिंगोली शहरातील बियाणे विक्रेत्यांकडे शेतकरी सोयाबीनच्या बियाण्यांची विचारणा करू लागले. पैैसे मोजण्याची तयारी असली तरी विक्रेत्यांकडून सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा सांगण्यात येवू लागला. आजमितीला बाजारात महाबीजच्या ३० किलोच्या एका बॅगसाठी २ हजार ३८५ रूपये मोजावे लागत असल्याचे रिटेल विक्रता रितेष अग्रवाल यांनी सांगितले. महाबीजच्या बियाण्यांची ही कथा असताना इगलच्या दरात विक्रमी वाढ झाली. गतवर्षी १ हजार ७०० रूपयांना असणारी बॅग यंदा २ हजार ७०० रूपयांवर गेली. तब्बल १ हजाराची वाढ झाली असताना या बियाणे अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगतात. आताच ही गत असताना पेरणीच्या वेळी सोयाबीनचे बियाणे मिळण्यासाठी उत्पादकांना कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी) उगवणशक्ती तपासून वापरा घरचे बियाणे कपटाच्या खोक्यात माती भरून वापसा होईल एवढे पाणी टाकावे. तद्नंतर या मातीत सोयाबीनचे दाणे मोजून टाकावे. गरजेपुरते पाणी टाकून मातीने झाकावे. आठवड्यानंतर उवगलेले बियाणे मोजावे. त्यानंतर पेरलेले बी आणि उगवलेले बी यांची मोजणी करावी. मोजणीअंती न उगवलेले बियाणे पेरणीच्या वेळी अधिक घ्यावे. याचप्रमाणे पोती भिजून आत मोजून सोयाबीनचे बियाणे टाकावे. त्यानंतर पोती गुंडाळून पाणी टाकावे. काही दिवसांनी पोती उकलून आत उगवलेले बियाणे मोजून उगवणशक्ती तपासता येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.