शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उत्पादनात ५० टक्क्यांची घट !

By admin | Updated: October 25, 2014 23:48 IST

लातूर : खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाने दिलेली उघडीप. त्यातच दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पावसावर बळीराजाने पेरणी केली. परंतु, आहे

लातूर : खरीप हंगामाच्या प्रारंभी पावसाने दिलेली उघडीप. त्यातच दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पावसावर बळीराजाने पेरणी केली. परंतु, आहे त्या पिकालाही पुरेसा पाऊस न झाल्याने जिल्हाभरातील ३ लाख ५ हजार हेक्टर्सवरील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़लातूर जिल्ह्यात खरीप हंगामात उशिरा पाऊस झाला. झालेल्या अल्पश: पावसावर हायब्रीड ज्वारी, तूर, साळ, हरभरा आदी पिकांची पेरणी झाली़ परंत,ु उशिरा झालेल्या पावसामुळे इतर पिकांच्या प्रमाणात सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली़ त्यातच लातूर जिल्ह्यातील अनेक गावात सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही़ तर काही ठिकाणी आहे त्या सोयाबीनच्या पिकाला पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ३ लाख ५ हजार हेक्टरवरील सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे़ दुसऱ्या टप्प्यात पाऊस न झाल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्यावर आले आहे़ तर काही हलक्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही निघालेला नाही़ गतवर्षी सोयाबीनच्या एका बॅगला बारा पोते उतार होता. परंतु, यावर्षी मात्र प्रती बॅगला सहा पोते उतार येत असल्याने शेतकऱ्याला अनंत अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ शेती निसर्गावर अवलंबून आहे़ निसर्गाने साथ दिली तर शेतकरी सुखी व निसर्गाने साथ नाही दिल्यास शेतकऱ्यासह सर्वच दुखी अशी परिस्थिती निर्माण होते़ परंतु, यावर्षी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे़ सोयाबीन हे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या पेऱ्यात इतर पिकाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली़ परंतु, उशिरा झालेला पाऊस व कमी पाऊस यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात निम्म्याने घट झाली. काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही़ लातूरच्या बाजापेठेत आहे त्या सोयाबीनलाही ३ हजार ५० रूपये क्विंटल प्रमाणे भाव मिळत आहे़ (प्रतिनिधी)४शेतकऱ्याने इतर पिकापेक्षा नगदी पीक म्हणून इतर पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु, निसर्गाच्या अवकृपेमुळे काही ठिकाणी सोयाबीन उगवले नाही तर काही ठिकाणी आलेल्या सोयाबीनच्या उत्पादनातून उत्पादनखर्चही निघत नसल्याने अनंत अडचणीला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया रेणापूर तालुक्यातील पळशी येथील भरत जाधव या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे़४जिल्ह्यात ३ लाख ५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांचे पावसाअभावी उत्पादन निम्म्यावर आलेले आहे़ ज्या शेतकऱ्याला गतवर्षी एका बॅगला बारा पोते होत होते, त्या शेतकऱ्याला सहा पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे़ परिणामी, सोयाबीनच्या उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक टी़एस़ मोटे यांनी सांगितले़