शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

६ लाख हेक्टरवर पेरण्या

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

रामेश्वर काकडे, नांदेड दोन महिन्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गेल्या आठवड्यात बरसलेल्या वरुणराजाने काही प्रमाणात कृपादृष्टी दाखविली.

रामेश्वर काकडे, नांदेडदोन महिन्यापासून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला गेल्या आठवड्यात बरसलेल्या वरुणराजाने काही प्रमाणात कृपादृष्टी दाखविली. यामुळे ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास ७ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रास्तावित आहे. यापैकी ३१ जुलैपर्यंत ६ लाख १५ हजार ५०० हेक्टरवर पेरा झाला असून काही भागात पावसाअभावी अद्याप पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरा झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ६२ हजार ३०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०४ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली असून एकूण क्षेत्राच्या ११६ टक्के आहे. तूर ५३ हजार ५०० हेक्टर, उडिद १७ हजार ८०० हेक्टर, मूग १६ हजार ५०० हेक्टर, ज्वारी ४८ हजार ९०० हेक्टर व इतर पिकांच्या अशा एकूण ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यातील परण्या झालेल्या क्षेत्रापैकी जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली आहे.गतवर्षी ३१ अखेर १०८ टक्के पेरण्या होऊन पीकेही तोऱ्यात डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळे खोळंबल्या आहेत. यासाठी अद्यापही जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतिक्षा बळीराजाला लागली आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला नसल्याने अजूनही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. ३१ जुलैपर्यंत तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र असे- नांदेड २६२०० हेक्टर, बिलोली ४३००० हेक्टर, मुखेड ३२८०० हे., कंधार ४९३०० हे., लोहा ६४३०० हे., हदगांव ५१९०० हे., भोकर ५४ हजार हेक्टर, देगलूर ४२४०० हे., किनवट ७१७००, मुखेड १८ हजार, हिमायतनगर २७८००, माहूर ३२६००, धर्माबाद २३३००, उमरी २९१००, अर्धापूर १७६००, नायगांव ३९९०० हेक्टर याप्रमाणे जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत ६ लाख १५५०० हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाल्या. एकूण क्षेत्राच्या ८१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या अधून-मधून बरसत असलेल्या पावसावर शेतकरी पेरण्या आटोपून घेत असले तरी काही तालुक्यांतील शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी ४० टक्के पेरणी मुखेड तालुक्यात झाली आहे. पावसा तुझे वागणे ़़़सध्या पावसाच्या सुरू असलेल्या लपंडावाचे नांदेडचे कवी मनोज बोरगावकर यांनी त्यांच्या शब्दात यथार्थ वर्णन केले आहे़पावसा तुझे वागणेकोणत्याही तर्कात बसत नाही, आमचे माणसांचे सोड़़़पणजमिनीत चिणल्या जात असलेल्यालाखो-करोडो बियांसाठी तुझ्याडोळ्यात पाण्याचा टिपूसही येऊ नये़़़तू अशी ओलच हरवून बसलास तर खोलवर काहीही ऊतरणार नाही़़़झाडं मुळासहित अन् माणसेमुळाबरहुकूम कोसळतील़़़