शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

करारात अडकले ‘सोनोग्राफी’ यंत्र !

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

सितम सोनवणे , लातूर लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात दररोज ७० ते ८० ओपीडी व २५ ते ३० प्रसुती असतात़

सितम सोनवणे , लातूरलेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात दररोज ७० ते ८० ओपीडी व २५ ते ३० प्रसुती असतात़ रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असतानाही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून सोनोग्राफी यंत्राविनाच रुग्णालय चालवले जात आहे़ रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांना सोनोग्राफीसाठी एकतर शासकीय रूग्णालयाचा आधार घ्यावा लागतो़ नाहीतर मग खाजगी सोनोग्राफी सेंटर चालकांकडून तपासणी करून घ्यावी लागते़ स्त्री रूग्णालयाच्या जवळपास एक ते दीड किलोमीटर सोनोग्राफी सेंटर्स नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे़ शासकीय रूग्णालयात सुविधा असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ गेल्या दोन वर्षांपासून लेबर कॉलनीतील या स्त्री रूग्णालयात रूग्णांना मिळणाऱ्या इतर सुविधा चांगल्या असल्याने रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत़ उपचारासाठी गेल्यावर तात्काळ सेवा मिळते, स्वच्छता चांगली असल्याने गावभागातील रूग्णांसह ग्रामीण भागातील रूग्णही या रूग्णालयात येत आहेत़ परंतु सर्व सुविधा चांगल्या असताना केवळ सोनोग्राफी मशीन याठिकाणी उपलब्ध नसल्याने गरोदर मातांची मोठी गैरसोय होत आहे़ जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना सर्व उपचार मोफत मिळत असले तरी या रूग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे रूग्ण वैतागले आहेत़ स्त्री रूग्णालयात तपासणीसाठी अत्यावश्यक असलेल्या सोनोग्राफी यंत्राचा अभाव असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना खाजगी सेंटर किंवा येथून जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय रूग्णालयाचा आधार घ्यावा लागतो़ शासकीय रूग्णालयात गेल्यावर लागलीच सुविधा मिळत नाही़ त्यामुळे सोनोग्राफी दोन दिवसांचा वेळ घालावा लागतो़केवळ सोनोग्राफी यंत्र नसल्याने स्त्रीरूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची संख्या घटत असल्याचे सांगण्यात येत आहे़ २०१३ मध्ये झाला कराऱ़़स्त्री रूग्णांलयात सोनोग्रफी मशीन बसविण्यासंदर्भात शासनस्तरावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत २०१३ मध्ये एका खाजगी कंपनीशी करार करण्यात आला आहे़ मात्र अद्यापही सोनोग्राफी विभाग सुरू केले नाही़ विशेष बाब म्हणाजे स्त्री रूग्णालयात रेडिओलॉजीस्ट कार्यरत आहेत़ सोनोग्राफी मशीन उपलब्घ झाल्यास याच रूग्णांलयात तपासणी होऊ शकते़ रूग्णांची गैरसोय होऊ नये, गरोदर मातांना सुविधा एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सोनोग्राफी यंत्राची मागणी केली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ एस़एस़वीर यांनी दिली़ स्त्री रूग्णालयात ९४ पदांना मान्यता मिळालेली आहे़ त्यातील ७३ पदे भरण्यात आली असून नवजात बालरोग परिचारिकांची कंत्राटी पद्धतीने भरून नवजात विभाग चालविला जात आहे़ विशेष म्हणजे प्रमुख जबाबदारीचे असिस्टंट मेट्रन हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त ठेवण्यात आले आहे़ सध्या स्त्री रूग्णालयात रूग्णसंख्या वाढत असली तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काही वेळा रूग्णांची गैरसोय होते़ रूग्णालयात सध्या दहा डॉक्टर कार्यरत आहेत़ पदभरती करीत असताना प्रशासनाने १३ डॉक्टरांची नेमणूक केली होती़ मात्र पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी ३ जण गेल्याने आता दहा डॉक्टरांवर रूग्णालयाचे कामकाज चालत आहे़ रेडिओलॉजिस्ट असतानाही केवळ सोनोग्राफी यंत्र नसल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे़ शिवाय, किरकोळ कारणांसाठी दीड ते दोन किलोमीटर असलेल्या शासकीय रूग्णालयात जावे लागते़