शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीचे आरोग्य तपासा अन् उत्पादन खर्चात बचत करा

By बापू सोळुंके | Updated: April 30, 2024 20:04 IST

शेत जमिनीचा पोत पाहूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारने ‘स्वाईल हेल्थ मिशन’ ही योजना आणली आहे.

छत्रपती संभाजीनगर : जास्तीतजास्त उत्पादन मिळावे यासाठी दरवर्षी शेतकरी शेतात भरमसाट रासायनिक खतांचा मारा करीत असतात. मात्र, यामुळे बऱ्याचदा गरज नसताना जमिनीमध्ये रासायनिक खतांची मात्रा अधिक होते. परिणामी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत पिकावरील खर्च अधिक होतो. ही बाब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी माती परीक्षण करावे, जमिनीची आरोग्य पत्रिका पाहूनच खताचे नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या जिल्हा मृद चाचणी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

शहरातील शहानूरवाडी येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या कॅम्पसमध्येच जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. अत्याधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. मातीचे परीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञ आणि अन्य अधिकारी कार्यरत आहेत. शेत जमिनीचा पोत पाहूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारने ‘स्वाईल हेल्थ मिशन’ ही योजना आणली आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील गावे निवडण्यात आली. गतवर्षी जिल्ह्यातील ६ हजार ४८० माती नमुन्यांचे परीक्षण करण्याचे लक्ष्य जिल्हा मृद चाचणी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. ३१ मार्चपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण केले. शिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गतही २ हजार ३१० माती नमुन्यांचे परीक्षण करण्यात आल्याची माहिती जिल्हा मृद चाचणी अधिकारी भीमराव वैद्य यांनी दिली. वैद्य म्हणाले, “शेतकऱ्यांनी दरवर्षी शेतातील माती नमुन्याचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. शेतजमिनीची आरोग्य पत्रिका आमच्या कार्यालयाकडून तयार करून घेतल्यानंतर जमिनीचा पोत कसा आहे, याची माहिती मिळते. जमिनीमध्ये अस्तित्वात असलेले घटक आणि कोणत्या घटकांची कमतरता आहे, याची माहिती मिळते. यामुळे रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो.

माती परीक्षणामुळे फायदादरवर्षी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे, मार्च ते मे अखेरपर्यंत माती नमुने प्रयोगशाळेकडे देऊ शकतात. माती परीक्षणामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश, सल्फर, जस्त तसेच लोह, झिंक इ. घटकांची माहिती मिळते. यासोबतच शेत जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाणही कळते. जमिनीत सेंद्रिय कर्बच नसेल तर रासायनिक खतांचा कितीही वापर केला तरी त्याचा पिकाला लाभ होत नाही. अनावश्यक रासायनिक खतांचा वापर टाळता येतो. परिणामी, उत्पादन खर्च कमी होतो.- भीमराव वैद्य, जिल्हा मृद चाचणी अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी