सहा जणांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी पदोन्नती

By Admin | Updated: May 23, 2014 00:24 IST2014-05-23T00:07:51+5:302014-05-23T00:24:55+5:30

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या सहा विस्तार अधिकारी/ कक्ष अधिकारी व कृषी अधिकार्‍यांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे

Six people promoted to Assistant Group Development Officer | सहा जणांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी पदोन्नती

सहा जणांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी पदोन्नती

 हिंगोली : जिल्हा परिषदेच्या सहा विस्तार अधिकारी/ कक्ष अधिकारी व कृषी अधिकार्‍यांना सहाय्यक गटविकास अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच त्यांना नवीन ठिकाणी नियुक्त्याही देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने औरंगाबाद विभागातील जिल्हा तांत्रिक सेवा व जिल्हा सेवा वर्ग-३ मधील ३२ कर्मचार्‍यांना महाराष्टÑ विकास सेवा गट- ब मध्ये तात्पुरत्या नियुक्त्या दिल्या आहेत. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. त्यानुसार विस्तार अधिकारी साहेबराव कांबळे यांना वसमत पंचायत समितीत गटविकास अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागातील कक्ष अधिकारी जे.एम. साहू यांची याच पदावर सेनगाव पंचायत समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. वसमतचे विस्तार अधिकारी आर.एस. बजाज यांची मानवत पंचायत समितीमध्ये तर सेनगावचे विस्तार अधिकारी एस.आर. बेले यांची सोनपेठ पंचायत समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. विस्तार अधिकारी एस.व्ही. गोरे यांची जिंतूरच्या सहाय्यक गटविकास अधिकारीपदी तर सामान्य प्रशासन विभागातील सांखिकी विस्तार अधिकारी डी.जी. पंडित यांची औंढा नागनाथ पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांचे आदेश २२ मे रोजी काढण्यात आले. सेनगाव, औंढा व वसमत येथील सहाय्यक गटविकास अधिकार्‍यांचे पद भरण्यात आले असले तरी हिंगोली व कळमनुरीचे पद रिक्तच आहे. पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना तातडीने पदभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Six people promoted to Assistant Group Development Officer