शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनात गंगापूर पिछाडीवर

By admin | Updated: May 22, 2014 00:55 IST

लालखाँ पठाण, गंगापूर उत्तरेला शिवना, दक्षिणेला गोदावरी या नद्यांसह दोन मोठे प्रकल्प असूनही गंगापूर तालुका आतापर्यंत कोरडाच राहिला आहे.

 लालखाँ पठाण, गंगापूर उत्तरेला शिवना, दक्षिणेला गोदावरी या नद्यांसह दोन मोठे प्रकल्प असूनही गंगापूर तालुका आतापर्यंत कोरडाच राहिला आहे. नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पोटचार्‍यांचे काम अद्याप अपूर्ण असल्याने तालुका सिंचनाच्या बाबतीत पिछाडीवर असून शेतकर्‍यांच्या बांधावर पाणी पोहोचलेलेच नाही. तालुका भौगोलिकदृष्ट्या पाण्याने संपन्न असला तरी या पाण्याचा पुरेपूर फायदा घेण्यास केवळ नेतृत्वाअभावी कमी पडला आहे. माजी खा. दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर यांचा अपवाद वगळता पाण्यासंदर्भात एकही पुढारी तालुक्याला न्याय देऊ शकला नाही. डोणगावकरांनी त्यांच्या काळात गंगापूर सह. साखर कारखान्याच्या माध्यमातून गोदावरी नदीवर ९ ठिकाणी लिप्ट इरिगेशन सुरू करून शेतकर्‍यांना सिंचनासाठी त्या पाण्याचा फायदा करून दिला होता; मात्र त्या नंतरच्या काळात सुरू असलेल्या योजना एकामागून एक बंद पडल्या व शेती सिंचनाचा प्रश्न उपस्थित झाला. गेल्या दोन-तीन वर्षात जेमतेम पाऊस झाल्यामुळे परिसरातील मध्यम प्रकल्प, पाझर तलाव कोरडेच राहिले. यावर्षी नांदूर-मधम्ोश्वर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले; मात्र पाण्याचा गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांना फायदा झाला नाही. टँकर लॉबीचे चांगभले गंगापूर तालुक्यात शेती सिंचनाची तर वाट लागलीय. शिवाय ग्रामीण भागातील अनेक गाव, वाड्या, वस्त्या, तांडे येथील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करीत आहेत. पिण्याच्या पाण्यावर शासनाची लाखो रुपयांची उधळपट्टी नावालाच असून टँकर लॉबी आपले चांगभले करून घेत आहे. निसर्गाने या तालुक्यास भरभरून दिलेले आहे. भौगोलिकदृष्ट्या तालुक्यात उपजतच पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत. यात गोदावरी नदीचा ३५ कि.मी. पाण्याचा जिवंत जलसाठा, तर शिवना नदी तालुक्याच्या मधोमध आहे. तालुक्याच्या पूर्वेला बारा महिने वाहणारी खांब नदी, त्याचबरोबर पावसाचा पाणी साठा करण्यासाठी तीन मध्यम प्रकल्प असा नैसर्गिकरीत्या पाण्याचा ओघ या तालुक्यात आहे. त्याचबरोबर नांदूर-मधमेश्वर कालव्यामुळे हक्काचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे. केवळ प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आज घडीला पाण्याचे स्रोत आहेत; परंतु प्रशासन व राज्यकर्त्यांची मानसिकता ही संकुचित झाल्याचे चित्र असल्यानेच या बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना सुरू झाल्या नाहीत. सद्य:स्थितीला अनेक योजना आहे त्याच स्थितीतच आहेत, तर काही ठिकाणी मात्र येथील यंत्रणा लांबविल्या आहेत. या संस्था आजही सुरू होऊ शकतात. सदरच्या योजना सुरू झाल्यास तालुक्यात कुठेच नवी योजना राबविण्याची गरज भासणार नाही. तालुक्याची ही परिस्थिती पाहून विद्यमान राजकीय नेतृत्व आणि प्रशासन भविष्यात तरी उपाययोजना करणार काय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी १९८३ ते १९८५ दरम्यानच्या कालावधीमध्ये साहेबराव पाटील डोणगावकर यांनी या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचा भविष्यात संभाव्य टंचाई भासणार नाही या दृष्टीने गोदावरी काठावरील गावातून लिप्ट इरिगेशनची निर्मिती करून सुमारे २० हजार एकर शेती ओलिताखाली आणली होती. यासाठी गोदाकाठावरील मांगेगाव, भिवधानोरा, गळनिंब, बगडी, ममदापूर, अंमळनेर, तळपिंप्री, शंकरपूर, बोरुडी, नवाबपूर, सिद्धपूर, भेंडाळा आदी ठिकाणी प्रत्यक्षात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून स्वतंत्र सहकारी संस्था अधिनियम १९६७ प्रमाणे परिसरातील शेतकर्‍यांना सभासद करून फेडरेशन तयार केले. यातूनच पाणीपुरवठा योजनेचा कारभार सुरू होता. दरम्यानच्या काळात गंगापूर साखर कारखान्याला राजकीय ग्रहण लागून या अत्यंत दूरदृष्टी ठेवून निर्माण केलेल्या पाणीपुरवठा योजनेसही घरघर लागली. वर्ष-दोन वर्षाच्या कालावधीत या संस्था एकापाठोपाठ बंद पडून भविष्यातील हरित क्रांतीचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. कारखानाही बंद आहे.