शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड निवडणूक निकाल: 'मातोश्री शब्द फिरवत नाही, मी मंत्री होणार'; विजयानंतर सत्तारांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 15:12 IST

Sillod Election Results 2019: उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपदाचा शब्द दिला

औरंगाबाद : सिल्लोड मतदारसंघात सनसनाटी विजय मिळवल्यानंतर शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी युतीच्या सत्तेत मी मंत्री होणारच असा दावा करत 'मातोश्री आपला शब्द फिरवत नाही' अशी पुस्ती जोडली. 

विजय मिळवल्यानंतर सत्तार पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले, मतदार संघातील हिंदू मतदारांचे मी विशेष करून आभार मानतो. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. तसेच मी मंत्री होणार, मंत्री पदाचा शब्द उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर दिला होता. मातोश्री आपला शब्द फिरवत नाही, असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमधून सनसनाटी विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल 1 लाख 22 हजार 627 मते घेत 24 हजार 465 मतांनी विजय साकार केला. लोकसभा निवडणुकीत पक्षासोबत मतभेद झाल्याने अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसचा त्याग केला. यातच ते भाजपमध्ये जाताजाता शिवसेनेत स्थिरावले. या घटनाक्रमामुळे चर्चेत असलेल्या सिल्लोड मतदार संघात कॉंग्रेसमधून सेनेत आलेल्या अब्दुल सत्तार यांना जनता स्वीकारेल का हा प्रश्न अनेकांना होता. त्यांना अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांनी तगडे आव्हान दिले होते. मतदारसंघातील सत्तार विरोधक एकवटून पालोदकर यांच्या मागे उभे राहिल्याने शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नव्हती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Abdul Sattarअब्दुल सत्तारsillod-acसिल्लोड