‘श्री’ विसर्जन मिरवणूक; मुख्य मार्गावरच अंधार

By Admin | Updated: September 10, 2014 00:52 IST2014-09-10T00:27:34+5:302014-09-10T00:52:27+5:30

औरंगाबाद : मुख्य ‘श्री’ विसर्जन मार्गावरील पथदिवे ८ सप्टेंबर रोजी बंद होते. त्यामुळे वाहनांच्या दिव्यांवरच गणेशभक्तांना मार्ग शोधत पुढे सरकावे लागले.

'Shree' immersion procession; The main road is dark | ‘श्री’ विसर्जन मिरवणूक; मुख्य मार्गावरच अंधार

‘श्री’ विसर्जन मिरवणूक; मुख्य मार्गावरच अंधार

औरंगाबाद : मुख्य ‘श्री’ विसर्जन मार्गावरील पथदिवे ८ सप्टेंबर रोजी बंद होते. त्यामुळे वाहनांच्या दिव्यांवरच गणेशभक्तांना मार्ग शोधत पुढे सरकावे लागले.
औरंगपुरा ते बाराभाई ताजिया, शहागंज ते सिटीचौक, टिळकपथ ते गुलमंडी, निरालाबाजार ते जि. प. मैदानापर्यंतच्या रस्त्यांवरील अनेक पथदिवे बंद होते. तसेच पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर ते शिवाजीनगर विसर्जन विहिरीपर्यंतच्या मिरवणूक मार्गावरील काही पथदिवे सुरू होते. एन-१२ सिडको-हडकोतील विसर्जन मार्गावरील पथदिव्यांचा लपंडाव सुरू होता. मनपाने ११२ कोटी रुपयांचे कंत्राट इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम्स प्रा. लि. आणि पॅरागॉन केबल इंडिया (जॉइंट व्हेंचर) या संस्थेला दिले आहे. तीन महिन्यांत विनवॉक कंपनीकडून सर्व पथदिवे सुरू करून घेतल्यानंतर नवीन संस्था शहरात काम सुरू करणार आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत जुन्या कंपनीचे तीन महिने पूर्ण होतात. तोपर्यंत पितृपक्ष, दसरा आणि दिवाळी सण होऊन जातात. शहरातील रस्ते या सणांमध्ये तरी प्रकाशमान होणार की नाही हे पालिकेला सांगणे सध्या तरी अवघड आहे.

Web Title: 'Shree' immersion procession; The main road is dark