शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

श्रमनिद्रेस प्रारंभ

By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST

तुळजापूर : ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽऽ’ च्या गजरात शनिवारी पहाटे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन उत्साहात पार पडले़ संबळाचा निनाद, आराध्यांची गाणी,

तुळजापूर : ‘आई राजा उदोऽऽ उदोऽऽऽ’ च्या गजरात शनिवारी पहाटे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन उत्साहात पार पडले़ संबळाचा निनाद, आराध्यांची गाणी, कुंकवाची उधळण करीत एकमेकांना आपट्याची पाने देवून नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या़श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात शनिवारी पहाटे एक वाजता देवीची नित्योपचार अभिषेक पूजा झाली़ त्यानंतर महंत व भोपे पुजारी यांनी देवीच्या मूर्तीस १०८ साडीवस्त्रांचा दिंड लावला व बऱ्हाणपूर येथून आलेल्या पलंग पालखीत देवीस बसविण्यात आले. त्यानंतर मंदिरास एक प्रदक्षिणा घालण्यात आली़ मंदिरातील पिंपळपारावर पालखी सिमोल्लंघनासाठी विसावल्यानंतर भोपी पुजाऱ्यांनी आणलेले घुगऱ्या, करंज्या याचा नैवेद्य देवीस दाखवून आरती करण्यात आली़ यानंतर उपस्थित पुजारी, भाविकांनी आपट्याची पाने, कुंकवाची उधळण करून ‘आई राजा उदोऽऽ चा जयघोष करीत’ संबळाच्या वाद्यात देवीचे सिमोल्लंघन केले़ यानंतर पालखी मंदिरातील सिंह गाभाऱ्यात आणण्यात आली़ या ठिकाणच्या पलंगावर देवीस चार दिवस श्रमनिद्रेस ठेवण्यात आले. सदरची श्रमनिद्रा बुधवारी पहाटेपर्यंत चालणार आहे़ या दिवशी रात्री छबिना मिरवणूक होवून ९ आॅक्टोबर रोजी अन्नदान, महाप्रसाद, छबीना व जोगवा या धार्मिक विधीने शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.शनिवारी सिमोल्लंघनानंतर मंदिर संस्थानच्या वतीने अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी पालखीचे मानकरी भगत कुटूंब यांचा प्रथेनुसार भरपेहरावा आहेर देवून सत्कार केला़ सिमोल्लंघन सोहळ्यावेळी महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, भोपी पुजारी अ‍ॅड़धीरज पाटील, अमर परमेश्वर, सचिन पाटील, सुधीर कदम, शशिकांत पाटील, भाऊसाहेब मलबा, दिनेश परमेश्वर, गब्बर सोंजी, सचिन परमेश्वर, पाळीकर पुजारी किशोर गंगणे, कुमार इंगळे, राजकुमार रोचकरी, प्रशांत गंगणे, सचिन अमृतराव, उपाध्ये अनंत कोंडो, नागेश अंबुलर्गे, सेवेकरी पलंगे, पवेकर, छत्रे, औटी, गोंधळी अनंत रसाळ, राजेंद्र गायकवाड, आराधी, व्यवस्थापक तहसीलदार सुजीत नरहरे, तहसीलदार काशिनाथ पाटील, सह व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, युवराज नळे, पालखीचे मानकरी अर्जुन भगत, बद्रीनाथ भगत, आगळगावचे पालखी सेवेकरी आदींसह देवीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन विधाते, पोनि ज्ञानोबा मुंडे यांनी बंदोबस्तावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत कडक बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)बुधवारी मूर्तीची पूर्ववत प्रतिष्ठापणा४नऊ दिवसांच्या शारदीय नवरात्रोत्सवानंतर शनिवारपासून श्री तुळजाभवानी मातेच्या श्रमनिद्रेस प्रारंभ झाला. बुधवारी (८ आॅक्टोबर) पहाटे देवीची मूर्ती सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापित होवून विविध धार्मिक विधीनंतर विशेष अभिषेक पूजेस प्रारंभ होणार आहे. या विशेष पूजेनंतर दोन तास अलंकार पूजा मांडून भाविकांच्या दर्शनास सुरूवात होते. सकाळी नित्योपचार अभिषेक पूजा, अंगारा, नैवेद्य, अलंकार पूजा आदी धार्मिक विधी होवून रात्री छबिना काढला जाणार आहे. या छबिन्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे सोलापूर येथील लाड समाजाच्या मानाच्या काठ्या, महंतांचा जोगवा या छबिन्यासोबत असतो. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातून तीन मंचकी निद्रा होतात. यात शाकंभरीतील मोहनिद्रा, नवरात्रीतील घोरनिद्रा आणि नवरात्रानंतरची श्रमनिद्रा. म्हणजेच एकूण २१ दिवस देवी मंचकी निद्रा घेते. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती ही चल म्हणून ओळखली जाते. या तिन्ही निद्रेवेळी देवीला दह्या-दुधाऐवजी सुवासिक तेलाचा दोन वेळा अभिषेक होतो. या कालावधीत भाविकांची संख्याही रोडावलेली असते.