शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेनेचा मोर्चा

By admin | Updated: August 23, 2014 00:56 IST

जालना : जालना जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला.

जालना : जालना जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या शासनाने मंजूर केल्या नाही तर सत्ताधाऱ्यांना फिरणे मुश्कील करू, असा इशारा माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी दिला.तालुका शिवसेनेच्या वतीने मामा चौकातून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप झाला. या मोर्चात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी जि.प.अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, आ. संतोष सांबरे, जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, जगन्नाथ काकडे, भाऊसाहेब घुगे, भानुदास घुगे, अ‍ॅड. भास्कर मगरे, पंडितराव भुतेकर, सविताताई किवंडे, संतोष मोहिते आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या प्रचंड मोर्चात शेतकऱ्यांनी सरकारविरूद्ध घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला होता.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समारोप प्रसंगी बोलताना खोतकर म्हणाले की, दुष्काळ हा शेतकऱ्यांची साथ सोडायला तयार नाही, अशा परिस्थितीत सरकारने मदतीचा हात देण्याऐवजी शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. उडीद, मूग, सोयाबीन, कापूस ही खरीपातील सर्व पिके जमिनदोस्त झाली आहे. शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये मदत करावी, जनावरांसाठी थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या नावावर जमा करावी, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारने मंजूर कराव्यात. यावेळी अनिरूद्ध खोतकर, आ. संतोष सांबरे, जगन्नाथ काकडे, संतोष मोहिते आदींची भाषणे झाली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध ११ मागण्यांचे निवेदन माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी भानुदास घुगे, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, अ‍ॅड. भास्कर मगरे, अशोक पवार, मुरलीधर शेजूळ, सुधाकर वाढेकर, गणेश कदम, अशोक खलसे, बाबुराव खरात, यादवराव राऊत, मुरलीधर थेटे, नारायण डोंगरे, सचिन भांदरगे, विलासराव सराटे, सखाराम भापकर, रखमाजी बिरले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)