शंभू महादेव परिसराने पांघरला हिरवा शालू

By Admin | Updated: August 18, 2015 23:53 IST2015-08-18T23:53:18+5:302015-08-18T23:53:18+5:30

शेषराव वायाळ , परतूर शंभू महादेव हिरवा शालू पांघरला असून, यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने लक्ष वेधणारा धबधबा मात्र कोरडाच आहे. तर वन्य जीवांना

Shambhu Mahadev complex has green cover | शंभू महादेव परिसराने पांघरला हिरवा शालू

शंभू महादेव परिसराने पांघरला हिरवा शालू


शेषराव वायाळ , परतूर
शंभू महादेव हिरवा शालू पांघरला असून, यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने लक्ष वेधणारा धबधबा मात्र कोरडाच आहे. तर वन्य जीवांना जंगलात खाद्य उरले नसल्याने ते गावात मिरवत आहेत.
शंभू महादेव हे प्रसिध्द देवस्थान आहे. या ठिकाणी महादेवाचे मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेले असल्याने हा परिसर पावसाळ्यात नयनरम्य होतो. या ठिकाणी देवदर्शनाबरोबरच निसर्गाचा आनंद लुटण्याससाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शैक्षणिक सहलीही या ठिकाणी दूरवरून येतात. डोंगराच्या कुशीत वसलेले हे देवस्थान विविध जातीच्या वृक्षांनी वेढलेले आहे. या देवस्थानात आलेल्या भाविकांचे व निसर्ग पे्रमींचे लक्ष वेधून घेतात. विविध जातीचे वृक्ष पानाफुलांनी सजलेले असतात. या ठिकाणी सतत वाहणारे झरे व झऱ्यातून मोठा मंदिराजवळ धबधबा तयार होतो, श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हजेरी लावतात. हा परिसर भाविकांनी सतत गजबजलेला असतो. यात्राही भरते. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने डोंगरांनी काही प्रमाणात हिरवा शालू पांघरला असला तरी या दिवसात वाहणारे झरे दिसत नाहीत. लक्ष वेधून घेणारा धबधबाही आटलेलाच आहे. दुष्काळाच्या चित्राने भाविकही रोडावले आहेत. वन्य जिवांना शेतात व जंगलात काही खाद्य उरले नसल्याने त्यांचा वावर आता खुलेआम गावात वाढला आहे. दुष्काळी परिस्थितीचा परिणाम देवस्थानावरही दिसून येत आहे.

Web Title: Shambhu Mahadev complex has green cover