शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शीतपेयाच्या व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने वृद्धाची सात लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:33 IST

शीतपेयाच्या व्यवसायात भागीदारीसह दरमहा ३३ हजार रुपये नफा देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धाची सात लाखांची फसवणूक करण्यात आली. १२ जानेवारी २०१७ रोजी संजयनगर, बायजीपुरा येथे झालेल्या या फसवणूकप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

औरंगाबाद : शीतपेयाच्या व्यवसायात भागीदारीसह दरमहा ३३ हजार रुपये नफा देण्याचे आमिष दाखवून एका वृद्धाची सात लाखांची फसवणूक करण्यात आली. १२ जानेवारी २०१७ रोजी संजयनगर, बायजीपुरा येथे झालेल्या या फसवणूकप्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.मोहम्मद इरफान मोहम्मद जावेद (रा. खोकडपुरा) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, पैठणगेट येथील रहिवासी खाजा हसन खान महेबूब खान (६९) आणि आरोपी परस्परांच्या तोंडओळखीचे आहेत. गतवर्षी जानेवारी महिन्यात इरफान खाजा हसन यांना भेटला तेव्हा त्याने एक्झोटिक झिरू या नावाने शीतपेयाचा व्यवसाय असल्याचे सांगितले. या व्यवसायात सात लाख रुपये गुंतवणूक केल्यास तुम्हाला भागीदारी मिळेल. शिवाय जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत तुम्हाला दरमहा ३३ हजार रुपये नफा मिळेल, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून खाजा यांनी इरफान याच्यासोबत १२ जानेवारी २०१७ रोजी लेखी करार केला आणि त्यास चार लाख रुपये दिले. करार करताना इरफानने खाजा यांना तारण म्हणून सात लाखांचे दोन धनादेश दिलेले आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा इरफानने व्यवसायासाठी आणखी तीन लाख रुपये नेले. करारानुसार आठ महिन्यांच्या कालावधीत खाजा यांना दरमहा ३३ हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र इरफान यांनी खाजा यांना एक रुपयाही परत केला नाही. एवढेच नव्हे तर करार संपल्यानंतर त्यांना त्याचे सात लाख रुपये दिले नाही. हे धनादेशही वटले नाही. शिवाय त्यांनी अधिक चौकशी केली असता इरफानचा शीतपेयाचा व्यवसाय नसल्याचे त्यांना समजले. यामुळे खाजा यांनी थेट जिन्सी पोलीस ठाण्यात इरफान विरोधात फसवणुकीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, तपास उपनिरीक्षक दत्ता शेळके करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी