शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार प्रलंबित फायलींचा निपटारा सुरू

By admin | Updated: November 2, 2014 00:24 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात प्रलंबित असलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या फायलींचा निपटारा सुरू झाला आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात प्रलंबित असलेल्या विविध प्रमाणपत्रांच्या फायलींचा निपटारा सुरू झाला आहे. सध्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त फायली प्रलंबित असून अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांचे गठ्ठे पडले आहेत. सेतू सुविधा केंद्रात दररोज विविध प्रमाणपत्रांसाठी शेकडो अर्ज दाखल होतात. यामध्ये रहिवासी, उत्पन्न, जात, राष्ट्रीयत्व, भूमिहीन, महिला आरक्षण अशा विविध प्रमाणपत्रांचा यात समावेश आहे. अर्ज दाखल केल्यानंतर ठराविक मुदतीत ही प्रमाणपत्रे मिळणे आवश्यक असते; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना ही प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. संपूर्ण जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे प्रमाणपत्रांवर सह्या करण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नव्हते, त्यामुळे या काळात तब्बल साडेतीन हजार प्रमाणपत्रांच्या फायली रखडल्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर आता अधिकाऱ्यांनी या फायलींचा निपटारा सुरू केला आहे. तहसील आणि उपविभागीय कार्यालयातील अधिकारी या फायलींवर स्वाक्षऱ्या करीत आहेत. सध्या दोन्ही कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या दालनांमध्ये या फायलींचे गठ्ठे साचले आहेत.