विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांना सेनेची उमेदवारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:01 IST2019-07-27T11:59:55+5:302019-07-27T12:01:35+5:30

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 

Sena nomination to Ambadas Danve for Legislative Council election ? | विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांना सेनेची उमेदवारी ?

विधान परिषद निवडणुकीत अंबादास दानवे यांना सेनेची उमेदवारी ?

ठळक मुद्दे जिल्हाप्रमुख दानवे यांचे नाव चर्चेत नसतानाही त्यांनी बाजी मारली

औरंगाबाद : विधान परिषदेच्याऔरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या उच्चस्तरीय सूत्रांनी याला दुजोरा दिला.

शिवसेनेकडून  या निवडणुकीसाठी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, नगरसेवक राजू वैद्य, नरेंद्र त्रिवेदी यांची नावे चर्चेत होती. याचवेळी मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांचे नावही चर्चेत होते. मात्र, जिल्हाप्रमुख दानवे यांचे नाव चर्चेत नसतानाही त्यांनी बाजी मारली आहे. याविषयीची अधिकृत घोषणा शनिवारी होणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. उमेदवारीच्या वृत्ताबाबत दानवे म्हणाले की, मला अधिकृत पत्र मिळालेले नाही. 

काँग्रेसकडून विद्यमान आ. सुभाष झांबड, अंबडचे बाबूराव कुलकर्णी, कन्नडचे संतोष कोल्हे आणि भोकरदनचे राजाभाऊ देशमुख यांची नावे चर्चेत आहेत.
 

Web Title: Sena nomination to Ambadas Danve for Legislative Council election ?