शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची बेभाव विक्री

By admin | Updated: May 7, 2014 23:59 IST

परतूर : भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक तसेच विक्रेतेही चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

परतूर : भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक तसेच विक्रेतेही चांगलेच अडचणीत सापडले आहेत. लागवड खर्चही निघत नाही. त्यातच मालवाहतुकीचा तोटा टाळण्यासाठी उत्पादक शेतकरी अक्षरश: जनावरांना चारा म्हणून भाजीपालाच टाकू लागले आहेत. भेंडी १५ ते २० रुपये, चवळी २० ते ३५रुपये, कांदा १० रुपये, गवार २० रुपये, वांगे, १५, टोमॅटे १५ रुपये किलो दर विक्री होत आहेत. पालक, मेथी तसेच कोथिंबीर जुडी दोन ते तीन रुपयांना विक्री होत आहे. हे दर अगदी किरकोळ असल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. भाजीपाला विकला तर भाजी नाही, तर पाला असे भाजीपाल्याबाबत म्हटले जाते. सध्या ते सत्यात उतरत आहे. यावर्षी सर्वत्र पाणीपातळी उत्तम असल्याने सर्वच पिकांना पाणी मुबलक मिळत आहे. तालुक्यात भाजीपाल्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यातच उत्पादन चांगले आल्याने टोमॅटो, भेंडी, वांगी, गवार, चवळी, कोबी, पालक आदी भाज्यांना किरकोळ भाव मिळत आहे. तो परवडत नसल्याने तो थेट जनावरांना वैरण म्हणून टाकला जात आहे. कांद्याचे भाव तर मोठ्या प्रमाणात गडगडल्याने कांदा विक्रेत्यांसह उत्पादकाच्यांही डोळ्यांत पाणी आणत आहे. यासंदर्भात भाजीपला विक्रेते दत्ता घनवट व भोकरे म्हणाले की, भाजीपाल्याला भाव नसल्याने मोठे नुकसान होत आहे. नफा होणे तर दूरच कधी-कधी घरातूनच पैसे जातात असेही ते म्हणाले. (वार्ताहर) दुसरा झटका गारपिटीत पिकांचे नुकसान झाल्याने अगोदरच अनेक शेतकरी गारद झाले. त्यातून अपवादानेच कोणी सुटले. मात्र तरीही उभारी घेण्यासाठी भाजीपाल्याकडे वळलेल्या शेतकर्‍यांना दर घसरणीचा दुसरा झटका बसला आहे.