शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाची निवड ३ एप्रिलला

By admin | Updated: March 29, 2016 00:52 IST

वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ३ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ३ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.साडेतीन महिन्यांपूर्वी १९ डिसेंबरला एकूण १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत विरोधकाला नामोहरम करून शिवसेनेने एकहाती सत्ता ताब्यात घेत १५ जागा मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. या निवडणुकीत भाजप व अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एका जागेवर बाजी मारली होती. ग्रामपंचायतीची निवडणूक होऊनही मावळत्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ न संपल्यामुळे नवीन सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामुळे जवळपास साडेतीन महिने ग्रामपंचायतीचा कारभार जुन्या पदाधिकाऱ्यांनीच सांभाळला. आता सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.राजकीय घडामोडींना वेग सरपंचपदासाठी लॉबिंग केलेल्या इच्छुक पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली असून सरपंच व उपसरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सरपंचपद बजाजनगर तर वडगावला उपसरपंचपद मिळण्याची शक्यता असून या विषयी वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. तूर्तास प्रबळ दावेदार सदस्यांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली असून सरपंचपद पटकावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असून उपसरपंचपदावर एससी प्रवर्गातील सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.अनुभवी की नवखा? चुरस कायम... यंदाच्या निवडणुकीत जवळपास सर्वच पदाधिकारी नवखे असून श्रीकृष्ण भोळे हे एकमेव सदस्य गेल्या तीन निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव असून इतर सर्वच पदाधिकारी नवखे असल्यामुळे या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार त्यांना पेलवेल का, अशी शंका काही राजकीय पदाधिकारी घेत आहेत. सध्या सरपंचपदासाठी महेश भोंडवे, सचिन गरड, श्रीकांत साळे, श्रीकृष्ण भोळे, रमाकांत भांगे तर उपसरपंचपदासाठी उषाबाई साळे, चंदाबाई काळे, हौसाबाई पाटोळे यांची नावे चर्चेत आहेत. खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची मर्जी राखणाऱ्या सदस्यांच्या गळ्यात सरपंच व उपसरपंचपदाची माळ पडणार असल्याची चर्चा वडगाव-बजाजनगरात सुरू आहे.