शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त बसगाड्यांमुळे सुरक्षितता धोक्यात

By admin | Updated: May 11, 2015 00:34 IST

सोमनाथ खताळ , बीड सुरक्षित प्रवासाचे दावे करणारे एसटी महामंडळ नादुरुस्त बसगाड्यांद्वारे प्रवाशांची ने- आण करत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे. आठ तासांत दोन बसगाड्यांचा अपघात झाला.

सोमनाथ खताळ , बीडसुरक्षित प्रवासाचे दावे करणारे एसटी महामंडळ नादुरुस्त बसगाड्यांद्वारे प्रवाशांची ने- आण करत असल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली आहे. आठ तासांत दोन बसगाड्यांचा अपघात झाला. या गाड्यांचे दुरुस्ती काम (मेंटेनन्स) व्यवस्थित न झाल्याने अपघात झाल्याचा सूर चालकांमधून उमटत आहे तर अधिकाऱ्यांनी मात्र रस्ता व वाहकाला दोषी धरले आहे. कोलमडलेले वेळापत्रक, स्थानकांची ुदुरवस्था व खटारा बसगाड्या... यामुळे सामान्यांची लालपरी ‘समस्या’पूरच्या दिशेने धावू लागली आहे.शनिवारी रात्री आठच्या सुमारास शिरूर नदीजवळ (अहमदनगर) व रविवारी सकाळी बीडजवळील तळेगाव फाट्याजवळ बीड आगाराच्या दोन बसगाड्यांचा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातास नेमके कारण काय होते ? याची कारणमिमांसा काढली असता बसगाड्या नादुरूस्त असल्याचे समजले. अनेक बसगाड्यांचे ब्रेकचे प्रॉब्लेम स्टेअरिंगही जाम जात असल्याचे चालकांनी सांगितले. या खटाऱ्या बसगाड्यांमधून प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणी येतात. एवढेच नव्हे तर चालकांना सुद्धा याचा मोठा त्रास होतो. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांमधून केला जात आहे. अपघातांबद्दल यांत्रिक अभियंता के. एस. लांडगे म्हणाले, आमच्या सर्व गाड्या दुरूस्त आहेत. चालक काही पण सांगतात. आम्ही रोज चेकिंग करतो, असेही त्यांनी सांगितले.ब्रेक-हॉर्न, एका बाजूला ओढणे, पॉवर स्टेअरिंग असून सुध्दा जाम होणे, वायपर बंद, गिअर बॉक्स व्यवस्थित नाही आदी समस्यांचा पाढा चालकांनी ‘लोकमत’समोर वाचून दाखविला.