शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा आवळली; अजिंठा लेणीवर २१ सीसीटीव्हींची नजर

By admin | Updated: August 19, 2014 02:16 IST

अजिंठा : अजिंठा लेणीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

अजिंठा : अजिंठा लेणीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाने २१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. १ आॅगस्टपासून हे कॅमेरे कार्यान्वित झाले असून लेणीतील ‘व्ह्यू’ पॉइंट बुकिंग आॅफिस परिसरातील सर्व हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. मागील वर्षी बिहारमधील महाबोधी मंदिरात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर ११ जुलै २०१३ रोजी लोकमतने अजिंठा लेणीतील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याची दखल घेऊन सिल्लोड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके यांनी लेणीत पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दररोज स्थानिक पोलीस, क्युआरटी, बॉम्बशोधक दल, सीआयडी यांची अजिंठा लेणीवर करडी नजर आहे. अचानक कधीही हा फोर्स येऊन लेणीच्या सुरक्षेचा आढावा घेतात. अजिंठा लेणी डोंगर माथ्यावर आहे. व्ह्यू पॉइंटवरून सहज अजिंठा लेणीत कुणीही प्रवेश करू शकतो. येथे कोणतीच सुरक्षा नाही हा मुद्दा ‘लोकमत’ने लावून धरला होता. त्याची दखल घेत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. एक कोटीचा खर्चअमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीसारखाच या कॅमेऱ्यांचाही दर्जा असून यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘ते’ तिघे संशयित सीसीटीव्हीत कैदरविवारी अजिंठा लेणीत बॉम्बची अफवा पसरली होती. त्यानंतर ते पोलिसांचे मॉक ड्रील असल्याचे उघड झाले. या मॉकड्रीलमधील एक महिला व दोन पुरुष बॅग ठेवून बाहेर पडणार तोच स्थानिक सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तिघे कैद झाले. त्यामुळे येथे मॉकड्रिलचा प्रयोग फसला अशी माहिती डी. एस. दानवे यांनी दिली. लेणीतील बुकिंग आॅफिस, गुफा क्र. ९,१०,२६, महत्त्वाच्या लेण्या, परिसरातील डोंगरात आणि व्ह्यू पॉइंटवर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचे सर्व कंट्रोलिंग बुकिंग आॅफिसमधून होते. ४लवकरच लेणीत इंटरनेट सेवा घेऊन अजिंठा लेणीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाच्या आॅफिसमध्ये दिसतील अशी व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती अजिंठा लेणीमधील पुरातत्व विभागाचे संरक्षक सहायक डी. एस. दानवे यांनी दिली.