शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅश सेक्शन’ची सुरक्षा धोक्यात !

By admin | Updated: July 12, 2015 00:17 IST

बीड : येथील आगारातील कॅश सेक्शनची सुरक्षा सध्या धोक्यात असल्याचे स्पष्ट दिसून येते. या विभागाच्या बाजूची संरक्षक भिंत तुटली आहे. सर्व परिसर मोकळा झाला आहे.

बीड : येथील आगारातील कॅश सेक्शनची सुरक्षा सध्या धोक्यात असल्याचे स्पष्ट दिसून येते. या विभागाच्या बाजूची संरक्षक भिंत तुटली आहे. सर्व परिसर मोकळा झाला आहे. यामुळे येथे अनोळखी लोकांचा वावर वाढला आहे.बसस्थानकाच्या पाठीमागून मिनी बायपासचे काम सुरू आहे. हा बायपास कॅश सेक्शन आणि आगाराच्या मधून जातो. हे काम करताना कॅश सेक्शनला असलेले कंपाऊंड तोडण्यात आले. तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. याचा परिणाम कॅश सेक्शनवर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या ठिकाणी दररोज लाखो रूपयांची आवक असते. त्यामुळे जमा होणाऱ्या रकमेची सुरक्षा रामभरोसे आहे.कंपाऊंड तोडल्यामुळे कॅश सेक्शन परिसरात अनोळखी लोकांचा वावर वाढला आहे. कर्मचारी की प्रवासी हे ओळखणेही सुरक्षा रक्षकांना कठीण बनले आहे. दिवसा तर एकही सुरक्षा रक्षक येथे नसतो. रात्री एकाच सुरक्षारक्षकावर येथील जबाबदारी असते. एसटीचा एक सुरक्षारक्षक आत व बाहेर जाणाऱ्या गाड्यांची नोंदणी करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे कॅश सेक्शनकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे दिसून येते.याबाबत सुरक्षा व दक्षता अधिकारी पाटील म्हणाले, रात्रीला तीन सुरक्षारक्षक असतात. दिवसा येथे कर्मचाऱ्यांचा वावर असल्यामुळे सुरक्षेची गरज नाही. सुरक्षेसंदर्भात वरिष्ठांना रिपोर्ट कळविला आहे, असे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)