शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई परिस्थितीवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: August 20, 2014 00:21 IST

परभणी : जिल्ह्यात सद्य स्थितीत केवळ १७.१५ टक्के सरासरी पर्जन्यमान झाले असल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.

परभणी : जिल्ह्यात सद्य स्थितीत केवळ १७.१५ टक्के सरासरी पर्जन्यमान झाले असल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. चिंतेत सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने गेल्या आठवड्यात राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त जाहीर केली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील नऊही तालुक्यांचा समावेश असल्याचा आदेश १९ आॅगस्ट रोजी महसूल विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे.मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमीच आहे. असे असताना यावर्षी समाधानकारक पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. जिल्ह्याचे जून ते आॅक्टोबर या कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७६४.५९ मि.मी. आहे. आजपर्यंत ४७०.४ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याची वार्षिक सरासरीची टक्केवारी केवळ १७.१५ टक्के झाली आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवर पेरलेली पिके धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पिके पिवळी पडली असून चांगला पाऊस न झाल्यास ही पिके वाचविणे कठीण जाणार आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याच्या उद्देशाने गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ९ तालुके येतात की नाही, या विषयी जिल्हावासियांना शंका वाटत होती. अखेर या संदर्भातील महसूल विभागाचा आदेश १९ आॅगस्ट रोजी निघाला. त्यामध्ये जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत या सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यांमधील बळीराजाला एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. ( जिल्हा प्रतिनिधी)