शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

बियाणाचा भाव ७ हजार, भुईमूग साडेतीन हजार

By admin | Updated: June 2, 2014 01:04 IST

कंधार : मागील वर्षी भुईमूग शेंगा बियाणासाठी ७ हजार रुपये क्विंटल प्रमाणे शेतकर्‍यांनी खरेदी केली़ नियोजन पूर्वक उन्हाळी भुईमूग लागवड केली़

 कंधार : मागील वर्षी भुईमूग शेंगा बियाणासाठी ७ हजार रुपये क्विंटल प्रमाणे शेतकर्‍यांनी खरेदी केली़ नियोजन पूर्वक उन्हाळी भुईमूग लागवड केली़ आता ३ हजार ५०० च्या आसपास भाव मिळत आहे़ खर्चही निघत नसल्याने शेतीची नवी कथा आकाराला येत आहे़ कथेतून शेतकरी व्यथीत होत असल्याचे चित्र आहे़ शेतकरी शेती फुलवण्यासाठी नानाविध उपाय करत असतो़ हिरव्या शेतीतून आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो़ परंतु मनाजोगते काहीही होत नसते़ तरीही निराश होत नाही, आत्मविवास ढळू देत नाही़ नव्या उमेदीने शेतीत नवीन प्रयोग शेतकरी करत असतो़ अशाच पद्धतीने यावर्षीचे नियोजन शेतकर्‍यांनी मागील वर्षी केले़ परंतु पदरी निराशा पडल्याचे समोर आले़ मागील वर्षी बियाणासाठी शेतकर्‍यांनी भुईमूग शेंगा ७ हजार रु. क्विंटलप्रमाणे खरेदी केली़ पेरणीपूर्व मशागत, लागवड, खत आदीने उन्हाळी भुईमूग लागवड करण्यात आली़ काढण्यापूर्वीच अवकाळी पावसाची हजेरी लागली़ काढताना शेतमजुरांना विणवणी करावी लागली़ एकरी ७-८ क्विंटल उतारा येईल, ही अपेक्षा फोल ठरली़ ५-६ क्विंटल प्रतिएकरचा उतारा आला आणि भाव मात्र ३ हजार ५०० असा मिळाला़ त्यामुळे खर्च अधिक व उत्पन्न कमी असा अनुभव शेतकर्‍यांना घ्यावा लागला़ (वार्ताहर)