शाळा सुटली अन् व्हॉटस् अ‍ॅपवर भरला वर्ग

By Admin | Updated: December 16, 2014 01:08 IST2014-12-16T00:52:55+5:302014-12-16T01:08:22+5:30

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद शाळा सुटली ... पाटी फुटली... चा आनंद सोमवारी शिक्षकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचा दिसला. शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग न करता

School breaks down and squares filled with whats app | शाळा सुटली अन् व्हॉटस् अ‍ॅपवर भरला वर्ग

शाळा सुटली अन् व्हॉटस् अ‍ॅपवर भरला वर्ग


शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद
शाळा सुटली ... पाटी फुटली... चा आनंद सोमवारी शिक्षकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचा दिसला. शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर चॅटिंग न करता आल्यामुळे दिवसभर कोंडल्या गेलेल्या शिक्षकांनी शाळा सुटताच, व्हॉटस् अ‍ॅपवर पोस्टची भरमार केली; परंतु व्हॉटस् अ‍ॅपमधून मिळालेला दिवसभराचा विसावा आनंद देऊन गेला, अशा प्रतिक्रिया देण्यास मात्र गुरुजी विसरले नाहीत.
शाळेच्या वेळेत व्हॉटस् अ‍ॅपवर पोस्ट टाकण्यात गुंतलेल्या शिक्षकांसंदर्भातील लोकमतमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने शैक्षणिक वर्तुळात उडालेली खळबळ अद्याप विरलेली नाही. रविवारी दिवसभर व्हॉटस् अ‍ॅपवर यासंदर्भात चर्चा होऊन ‘शाळेच्या वेळेत आम्ही फक्त अध्ययन आणि अध्यापन करू, तुम्हीही करा’ अशा पोस्ट बहुतांश शिक्षक व शिक्षक संघटनांनी एकमेकांना टाकल्या होत्या, तसेच सोमवारी शाळेच्या वेळेत व्हॉटस अ‍ॅप,मोबाईलचा वापर करू नका, असे आवाहनच सर्वांनी केले होते. त्या आवाहनाची बुज शिक्षक व शिक्षक संघटनांनी राखल्याचे सोमवारी दिवसभर सामसूम झालेल्या व्हॉटस् अ‍ॅपच्या कट्ट्यावरून दिसली. शिक्षक व शिक्षक संघटनांचा व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत अ‍ॅक्टिव्ह होते. त्यानंतर दुपारी साडेचारपर्यंत या ग्रुपवर शांतता होती. अगदी बंद झाल्यागत हे ग्रुप भासत होते; परंतु जशी शाळा सुटली, प्रत्येक ग्रुपवर पहिल्या अर्ध्या तासात २५ ते ५० हून अधिक पोस्ट भराभर पडल्या होत्या. त्यानंतर व्हॉटस् अ‍ॅप बंदीचे फायदे- तोट्यावर चर्चा ग्रुपवर सुरू होती.

Web Title: School breaks down and squares filled with whats app