शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

एनसीईआरटीच्या पुस्तकांचा तुटवडा

By admin | Updated: June 11, 2016 00:16 IST

औरंगाबाद : ‘नीट’ साठी आवश्यक असलेल्या एनसीईआरटीच्या पुस्तकांचा शहरात तुटवडा असून, यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.

औरंगाबाद : ‘नीट’ साठी आवश्यक असलेल्या एनसीईआरटीच्या पुस्तकांचा शहरात तुटवडा असून, यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पुढील वर्षी (२०१७) विद्यार्थ्यांना ‘नीट’ (नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) अनिवार्य असल्याने शहरातील बारावीत शिकणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी त्याची तयारी सुरूकेली आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यासाठीचे वर्गही सुरू केले आहेत. खाजगी कोचिंगमध्येही सुट्या संपून क्लासेस सुरू झाले आहेत. बारावीचे जे विद्यार्थी सीबीएसई अभ्यासक्रम शिकतात त्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर २०१५ मध्येच एनसीईआरटीची पुस्तके घेतली आहेत. मात्र, राज्य मंडळाचा अभ्यासक्रम शिकणाऱ्या अकरावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्याना ‘नीट’ द्यावयाची आहे, अशा विद्यार्थ्यांना आता एनसीईआरटीची पुस्तके घ्यावी लागणार आहेत. राज्य मंडळाचे जे विद्यार्थी अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीत गेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना आता एनसीईआरटीची अकरावी आणि बारावीची पुस्तके घ्यावी लागणार आहेत. औरंगपुऱ्यातील विक्रेत्याने सांगितले की, एनसीईआरटीची अकरावी, बारावीची सर्वच पुस्तके १० जूननंतर शहरात उपलब्ध होतील. शहरातील औरंगपुरा आणि सिडको परिसरातील काही मोठ्या पुस्तक विक्रेत्यांकडे चौकशी केली असता केवळ भौतिकशास्त्रा (फिजिक्स) चे बारावीचे पुस्तक उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. काही विक्रेत्यांकडे एनसीईआरटीची अकरावी आणि बारावीची मिळून एक किंवा दोन पुस्तके उपलब्ध आहेत. ‘नीट’मुळे आधीच त्रस्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके लवकर उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. दहावीसाठी अर्ज करण्याची मुदत२० जूनपर्यंतऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फ त माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी यंदाही जुलै-आॅगस्टमध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र आॅनलाईन भरणे बंधनकारक आहे. आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत ही २० जून असून, विलंब शुल्कासह आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत २१ ते २४ जूनपर्यंत आहे. माध्यमिक शाळांनी बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत हीदेखील २१ ते २४ जूनदरम्यान असून, विलंब शुल्कासह चलन भरण्याची मुदत २७ ते २९ जूनपर्यंत आहे. माध्यमिक शाळांनी ३० जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याच्या सूचना मंडळाने दिल्या असून, पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदनपत्र शाळेमार्फ तच भरण्याचे आवाहन विभागीय मंडळाने केले आहे.