सतीश चव्हाण यांच्याकडे १९ कोटींची मालमत्ता

By Admin | Updated: June 2, 2014 01:34 IST2014-06-02T01:26:06+5:302014-06-02T01:34:23+5:30

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या कुटुंबियांकडे स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची मिळून एकूण १९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Satish Chavan has assets worth Rs 19 crore | सतीश चव्हाण यांच्याकडे १९ कोटींची मालमत्ता

सतीश चव्हाण यांच्याकडे १९ कोटींची मालमत्ता

 औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या कुटुंबियांकडे स्थावर आणि जंगम अशा दोन्ही स्वरूपाची मिळून एकूण १९ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या विवरणपत्रात चव्हाण यांनी ही माहिती सादर केली आहे. सतीश चव्हाण यांनी शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत त्यांनी आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या मालमत्तेचे विवरणपत्रही जोडले आहे. त्यानुसार चव्हाण यांच्या कुटुंबाकडे जंगम स्वरूपात सुमारे दोन कोटी रुपयांची मालमत्ता आहे. चव्हाण यांनी त्यांच्याकडे ९ लाख ३१ हजार रुपयांची आणि पत्नी आशा यांच्याकडे ५० हजार रुपयांची रोकड दाखविली आहे. सतीश चव्हाण यांच्या नावे बँकेत २ लाख ९ हजार आणि पत्नीच्या नावे ६ हजार रुपये आहेत. शेअर्स, बॉण्डच्या स्वरूपात चव्हाण यांच्या कुटुंबाकडे ८६ लाख रुपये आहेत. कंपन्या, विमा या स्वरूपातील गुंतवणूकही २९ लाख रुपये इतकी आहे. ही गुंतवणूक सतीश चव्हाण, पत्नी आशा आणि मुलगा अक्षय यांच्या नावे आहे. याशिवाय चव्हाण कुटुंबियांकडे १५ लाख ४० हजार रुपयांची वाहने आहेत. तसेच त्यांच्याकडे एकूण ४५ लाख ५० हजार रुपयांचे दागिने आहेत. सतीश चव्हाण यांच्या कुटुंबियांची स्थावर मालमत्ता ही १७ कोटी रुपयांच्या घरात आहे. स्वत: चव्हाण यांच्या नावे यातील १४ कोटी ८६ लाख आणि पत्नी आशा यांच्या नावावर २ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे येथील घर, औरंगाबादेतील हॉटेल, पैठण तालुक्यातील घारी येथील शेतजमीन यांचा समावेश आहे.

Web Title: Satish Chavan has assets worth Rs 19 crore