शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

सरस्वती भुवन अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:51 AM

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित ३८ व्या गादिया चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या उपांत्य फेरीत अल्फोन्सा इंग्लिश स्कूलने स्वामी विवेकानंद अकॅडमीचा ३७ धावांनी, तर सरस्वती भुवन प्रशालेने महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा ८ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित ३८ व्या गादिया चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या उपांत्य फेरीत अल्फोन्सा इंग्लिश स्कूलने स्वामी विवेकानंद अकॅडमीचा ३७ धावांनी, तर सरस्वती भुवन प्रशालेने महाराष्ट्र पब्लिक स्कूलचा ८ गडी राखून पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. सरस्वती भुवन हायस्कूल आणि अल्फोन्सा इंग्लिश स्कूल यांच्यात उद्या, शुक्रवारी एडीसीएच्या मैदानावर सकाळी १० वाजता अंतिम सामना रंगणार आहे.अल्फोन्सा इंग्लिश स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकांत ८ बाद १११ धावा केल्या. त्यांच्याकडून जहांगीर हकीम याने ३६ चेंडूंत ४१ आणि यश हार्दे याने २१ धावा केल्या. स्वामी विवेकानंद अकॅडमीकडून देवश्री भावसार याने १५ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स्वामी विवेकानंद अकॅडमीचा संघ ७४ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून आनंद साळवेने १८ व रोहित बनसोडेने १७ धावा केल्या. अल्फोन्साकडून निशांत सुरवसेने ११ धावांत ३ गडी बाद केले. यश साळवेने २, तर जहांगीर हकीम, उत्सव सिन्हा व सौरव चौधरी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसºया उपांत्य फेरीत महाराष्ट्र पब्लिक स्कूलने १५ षटकांत ६ बाद ९९ धावा केल्या. त्यांच्याकडून शशिकांत भडगळे याने ३३ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५२ व कुणाल शिंदेने १९ धावा केल्या. सरस्वती भुवनकडून चैतन्य वाघमारे, मंदार कुलकर्णी, आदित्य राजहंस व प्रसाद कुलकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात सरस्वती भुवन प्रशालेने विजयी लक्ष्य फक्त २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून आदित्य राजहंसने नाबाद ३०, कृष्णा पवारने २७ व चैतन्य वाघमारे याने नाबाद २६ धावा केल्या. महाराष्ट्र पब्लिक स्कूलकडून अतिश लोखंडे व शशांक सांगळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.