शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने साळेगाव-लाखा रस्ता उखडला!

By admin | Updated: May 21, 2014 00:13 IST

केज: केज तालुक्यातील साळेगाव ते लाखा हा पूर्णत: उखडला असून, वाहनधारकांना येथून जाताना कसरत करावी लागत आहे.

केज: केज तालुक्यातील साळेगाव ते लाखा हा पूर्णत: उखडला असून, वाहनधारकांना येथून जाताना कसरत करावी लागत आहे. आजारी रुग्ण आणि प्रसूतीसाठी महिलांना याच रस्त्यावरुन जावे लागत असल्याने त्यांचे एक प्रकारे हेळसांड होत आहे. या रस्ता कामाची चौकशी करुन डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. साळेगाव-मांगवडगाव ते लाखा हा १२ कि.मी.चा डांबरी रस्ता करण्यात आला होता. पण गुत्तेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या मार्गावरील रस्ता पूर्णत: उखडला आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघातही होत आहेत. दोन महिन्यात पाच ते दहा दुचाकी घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. केज पंचायत समितीच्या सभापतीपदी तारामती उबाळे यांची वर्णी लागल्यानंतर या भागात विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र बससेवा सुरू करण्यापलीकडे त्यांना इतर कामे करण्यात आली नसल्याची खंत शशिकांत थोरात, बापू डिसले यांनी व्यक्त केली. या निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जीवन रामीष्ठ, शहाजीराव इंगळे, नाना भांगे, हनुमंत घाडगे, आश्रुबा वायबसे, बंडू भांगे, दत्ता इंगळे, पांडुरंग इंगळे, शशिकांत थोरात आदींनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. (वार्ताहर)