शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे शेतीची विक्री

By admin | Updated: July 31, 2016 02:45 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखेगाव (ता. कामठी) येथील एका शेतकऱ्याची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे.

सरपंचासह तिघांना अटक : अधिकाऱ्यांच्या नावांचे शिक्के जप्त मौदा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाखेगाव (ता. कामठी) येथील एका शेतकऱ्याची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. या कारवाईत मौदा पोलिसांनी केम-पळसाडचे सरपंच विनोद शेंडे यांच्यासह अन्य तीन आरोपींना अटक केली आहे. विनोद विश्वनाथ शेंडे (३३, रा. केम), अजय मनोहर घोडमारे (३१, रा. पांढरकवडा), राजेश खुशाल चरडे (३४, रा. चिकना) व मोरेश्वर भाकरू चापरे (३२, रा. पानमारा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मनोहर गणपतराव आष्टनकर (रा. गुमगाव, ता. हिंगणा) यांच्या मालकीची शेतजमीन जाखेगाव प.ह.नं. २६(अ), सर्व्हे नं.७४/१, आराजी ०.४२ हेक्टर आर, ०.००२ हे.आर, ००.४४ हे. आर. व सर्व्हे नं. ३७/२ ब आराजी ००.८१ हे.आर. अशी एकूण ०१.२५ हेक्टर आर मिळकत आहे. शेतमालक स्वत: जमीन न कसता ठेकेपद्धतीने कसण्यास देतात. त्यामुळे सदर शेतीवर त्यांची दररोजची वहीवाट नसते. या गोष्टीचा गैरफायदा या प्रकरणाचा ‘मास्टरमार्इंड’ आरोपी सरपंच विनोद शेंडेने घेतला. सदर शेतीचा सौदा अजय मनोहर घोडमारे (रा. पांढरकवडा, पोलीस स्टेशन, कुही) यांच्याशी केला. दरम्यान आरोपीने उपविभागीय अधिकारी, दुय्यम निबंधक, तहसीलदार अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावांचे खोटे रबरी शिक्के बनवून शेतीची बनावट कागदपत्रे तयार केली. आरोपी राजेश खुशाल चरडे व मोरेश्वर भाकरू चापरे यांच्या साक्षीनिशी रजिस्ट्री करुन दिली. रजिस्ट्रीची कागदपत्रे घेऊन आरोपी अजय मनोहर घोडमारे याने सदर शेती आपल्या नावे करण्यासाठी फेरफार प्रकरण जाखेगावचे तलाठी काळबांडे यांच्याकडे सादर केले. तलाठी काळबांडे यांनी या खरेदी-विक्री व्यवहाराबाबत गुमगावचे (ता. हिंगणा) तलाठी अनिल ब्रम्हे यांच्याशी चर्चा केली. यावरून तलाठी ब्रम्हे यांनी भ्रमणध्वनीवरूनशेतमालक मनोहर आष्टनकर यांच्याशी संपर्क साधला असता, अशा प्रकारचा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर शेतमालक मनोहर आष्टनकर यांनी सदर फेरफार थांबविण्याची विनंती महसूल विभागाकडे केली व बनावट रजिस्ट्रीची तक्रार शेतखरेदीदार अजय घोडमारे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मौदा येथे केली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मौद्याचे ठाणेदार भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर धोपाडे यांनी तपास सुरू केला होता. प्रकरणाचा मास्टरमार्इंड असलेला सरपंच विनोद शेंडे याचा शोध घेतला. शेत खरेदीदार अजय मनोहर घोडमारे, साक्षीदार राजेश चरडे, मोरेश्वर चापरे यांच्यासह सरपंच विनोद शेंडे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१,४७३, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली. (तालुका प्रतिनिधी)