शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

बरखास्त केलेली भरारी पथके पुन्हा कार्यान्वित

By admin | Updated: October 30, 2014 00:30 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात बुधवारपासून पदवी परीक्षांना सुरुवात झाली. परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच मंगळवारी रात्री कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी तडकाफडकी १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. आज बामुक्टा या संघटनेच्या शिष्टमंळाने कुलगुरूंची भेट घेऊन विविध तांत्रिक बाबी निदर्शनास आणून दिल्यावर भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.विद्यापीठ प्रशासनाने यंदा कॉपीमुक्त धोरण कडकपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्याचा संपूर्ण वर्षाचा परफॉर्मन्स रद्द करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतलाय. परीक्षा मंडळातील ज्येष्ठ सदस्य डॉ. कल्याण लघाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या निर्देशाप्रमाणे विद्यापीठ कार्यक्षेत्रात म्हणजेच चार जिल्ह्यांमध्ये १७ भरारी पथके नेमली होती. भरारी पथके स्थापन करताना त्यामध्ये प्राध्यापकांची सेवाज्येष्ठता, आरक्षण व महिला या तिन्ही निकषांची पूर्तता करण्यात आलेली नाही, म्हणून कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी मंगळवारी रात्री उशिरा सर्व १७ भरारी पथके बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.आज बामुक्टा संघटनेच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन सेवाज्येष्ठता, आरक्षण, महिलांचा समावेश असल्याबद्दलची सर्व माहिती दिली. तब्बल ४५ मिनिटे चर्चा करण्यात आली. त्यानंतर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी सर्व भरारी पथके पुन्हा कार्यान्वित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. शिष्टमंडळात अधिष्ठाता विलास खंदारे, डॉ. एस.एस. शेख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य शिवाजी कदम, सिनेट सदस्य डॉ. गणी पटेल, डॉ. संभाजी वाघमारे, डॉ. जिगे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. संजय सांभाळकर, डॉ. संजय पाटील, बाबा सलामपुरे आदींची उपस्थिती होती.